राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत

By Admin | Updated: June 21, 2014 22:26 IST2014-06-21T22:26:54+5:302014-06-21T22:26:54+5:30

शिवसेना आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा 2क्क्9मधील मतदारांचा कौल या विधानसभा निवडणुकीत काय असेल, याची शिरूर-हवेली मतदारसंघात उत्सुकता आहे.

The main fight between the NCP-BJP itself | राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत

राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत

>शिरूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा 2क्क्9मधील मतदारांचा कौल या विधानसभा निवडणुकीत काय असेल, याची शिरूर-हवेली मतदारसंघात उत्सुकता आहे. मतदारांचा कौल टिकविण्यचे राष्ट्रवादीसमोर, तर हा कौल आपल्या बाजूने वळविण्याचे भाजपसमोरचे आव्हान आहे. मतविभाजनासाठी ऐन वेळी अनपेक्षित बंडखोर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनसेबरोबरच आम आदमी पक्षही  रिंगणात असण्याची शक्यता आहे; 
2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळरावांना 12 हजारांची आघाडी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या ा विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे अशोक पवार निवडून आले. मात्र, हा विजय सहज शक्य झाला नव्हता. कारण, मूळ राष्ट्रवादीच्याच विचाराचे  दोन उमेदवार एक भाजपतर्फे तर एक बंडखोर म्हणून लढत होते.  या दोघांनी 5क् हजारांहून अधिक मते घेतली.  पवार यांनी त्या वेळी अपक्ष उमेदवार बाबूराव पाचण्रे यांच्यापेक्षा 7,567 हजार मते जास्त मिळवून विजय संपादन केला. मतविभागणी झाली नसती, तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. 
गेल्या वेळी भाजपतर्फे लढलेले मंगलदास बांदल व बंडखोरी केलेले निवृत्ती गवारे हे आता राष्ट्रवादीत  आहेत. 2क्14च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे आमदार पवार यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बांदल राष्ट्रवादीची उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची इच्छा प्रकट केली आहे. 
महायुतीत शिरूर-हवेलीची जागा भाजपाकडे आहे. 2क्क्9ला  भाजप सोडून अपक्ष लढलेले बाबूराव पाचण्रे पुन्हा भाजपात सक्रिय झाले आहेत. नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही उमेदवारीची इच्छा प्रकट केली आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर समीकरणो बदलू शकतात.  केंद्रात भाजपने मिळविलेले बहुमत व मोदी लाट याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या इराद्याने महायुती निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. यातच मतदारसंघात महायुतीला 54 हजारांची आघाडी मिळाली आहे. पाचण्रे यांचा वैयक्तिक संपर्क व खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची त्यांना मिळत असलेली साथ ही महायुतीची जमेची बाजू आहे. म्पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर  जाण्याचा आमदार पवारांचा मानस आहे आपकडून विकास लवांडे लढण्याच्या तयारीत आहेत. मनसेही उमेदवार उभा करील. (वार्ताहर) 
 
राष्ट्रवादीअशोक पवार53, 936
अपक्षबाबुराव पाचण्रे 46, 369
भाजपमंगलदास बांदल 37, 996
अपक्षनिवृत्तीअण्णा गवारे2क्, 521

Web Title: The main fight between the NCP-BJP itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.