शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:19 IST

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला : डॉ. दत्तात्रय तापकीरईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच : डॉ. सदानंद मोरे

पुणे : ‘‘एका धर्माच्या भाषेत दुसऱ्या धर्माची भाषा व्यक्त करताना ज्या अडचणी येतात त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मराठवाडा मित्रमंडळ, डायोसिस अॉफ पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि स्वच्छंद यांच्या वतीने आयोजित ‘आंतरधर्मीय सुसंवाद’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. भाऊसाहेब जाधव, डॉ. थॉमस डाबरे आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, की प्रत्येक धर्म हा एका विशिष्ट भाषेत सांगितलेला असतो. धर्म भाषा कितीही वेगवेगळ्या असोत, मात्र ईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच असतो. ज्या त्या भाषेत जो तो धर्म सांगताना काही एक विशिष्ट कल्पना मांडल्या जातात. एक चौकट तयार केलेली असते आणि त्या चौकटीत बोलावे लागते, मग त्यासाठी तुम्ही कुठलीही भाषा वापरू शकता. या वेळी सर्वधर्मीय एकतेचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या सुमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रवींद्र शाळू, आरती आठल्ये, जयंत सबनीस, अनघा धायगुडे यांचा समावेश होता. प्रा. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, ‘एक दिल के सौ तुकडे कुछ इधर कुछ उधर’ या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे मानवता अशी तुकड्या-तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. आपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला आहे. 

डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, राष्ट्र कार्यासाठी या देशातील एकात्मता टिकवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आपण प्रजा अंतिम मानून राष्ट्र, सत्ता आणि सरकार प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेमध्ये असलेली विभिन्नता लक्षात घेऊन या ठिकाणी जगणे, तसे प्रयत्न करणे असे झाले, तर देशामध्ये शांती-सलोखा टिकून राहील.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे