शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘महिंद्रा’त अठरा हजार रुपयांची पगारवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 23:32 IST

कारखान्याची उत्पादनक्षमता वाढली तर कामगारांना कंपनी व्यवस्थापन वेतनकरारात भरघोस वाढ करण्यासाठी विचार करते.

कुरळी : कारखान्याची उत्पादनक्षमता वाढली तर कामगारांना कंपनी व्यवस्थापन वेतनकरारात भरघोस वाढ करण्यासाठी विचार करते. उद्योग टिकला तरच कारखाना टिकतो हेसुद्धा विसरून चालणार नाही. या वेतनकरारात कामगारांबरोबर कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्राने कामगारांना सर्वाधिक अठरा हजारांची पगारवाढ केली.या पगारवाढीच्या आनंदोत्सवानिमित्त चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा व्हेईकल्स मॅनुफॅक्चरिंग कंपनीमध्ये कार्यक्रम आयोजिला होता. यावेळी माजी कामगारमंत्री सचिन अहिर, संतोष शिंदे, युवानेते संतोष शिंदे, संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील, जनरल सेक्रेटरी मनोज येळवंडे उपस्थित होते.

वार्षिक बोनसची वाढ लक्षात घेता कायमस्वरुपी कामगारांना १८ हजार प्रतिमहिना अशी भरघोस वेतनवाढ होणार आहे. ही पगारवाढ कामगारांच्या उत्पादकतेशी निगडित असून कंपनीस मागील उत्पादनावर दहा टक्के वाढ मिळणार आहे. हा करार साडेतीन वर्षांचा आहे. यावेळी कपंनीचे कार्यकारी अधिकारी विजय कालरा, उपाध्यक्ष विजय नायर, प्लांट हेड नचिकेत कोडकणी, व्यवस्थापक महेश करंदीकर, संजीव आनंद, प्रवीण पत्रावळी, असन सरण, ज्ञानेश पोतदार उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे