शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर ‘महिलाराज ’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:48 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रथमच प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक या प्रमाणे हे मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे.

ठळक मुद्देमतदान केंद्रावर सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांपासून सर्व कर्मचारी, अधिकारी महिलांची नियुक्तीकसबा विधनसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिकअनेक विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदारांची संख्या जवळजवळ पन्नास-पन्नास टक्के प्रमाण

पुणे : जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु आहे. यामध्ये मतदान केंद्र निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यात २१ मतदान केंद्र शंभर टक्के महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रथमच प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक या प्रमाणे हे मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे.गेल्या काही वर्षांत महिला मतदारांची मतदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगने यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रायोगिक तत्वावर एका मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात २१ विधनसभा मतदार संघ  असून, या प्रत्येक मतदार संघामध्ये एक केंद्र प्रायोगिक तत्वावर महिला कर्मचारी, अधिकाºयांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत.---कसबा विधनसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिकपुणे जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदारांची संख्या जवळजवळ पन्नास-पन्नास टक्के असे प्रमाण आहे. परंतु पुणे शहरातील कसब विधानसभा मतदार संघामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. कसब्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ७५८ इतकी आहे, तर येथे महिला मतदार तब्बल १ लाख ४४ हजार १२९ ऐवढ्या आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा २ हजार ३७१ महिला मतदार अधिक आहेत. ---महिला सक्षमिकरण हाच मुख्य उद्देशमतदार आणि मतदान प्रक्रियेमध्ये देखील महिलांची संख्या वाढत आहे. यामुळेच निवडणूक प्रक्रियेमध्ये लैंगिक समानता व महिलांच्या अधिक रचनात्मक सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये किमान एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे. यामागे महिला सक्षमीकरण हाच मुख्य उद्देश आहे.- मोनिका सिंग, जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिला