शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’मध्ये महेश काळे व राकेश चौरसिया यांचे होणार सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 11:27 IST

बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते.

पुणे : अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक महेश काळे आणि बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते.या जादूई आविष्कारांची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने सोमवारी (२८) पहाटे साडेपाचला महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित या कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत राकेश चौरसिया यांच्या बासरीची जादूही अनुभवास मिळणार आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स अणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्रीबंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऊर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत.

कार्यक्रम स्थळमहालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळदिनांक : सोमवार, २८ ऑक्टोबरवेळ : पहाटे ५.३० वाजताकार्यक्रमाच्या विनामूल्यप्रवेशिका उपलब्ध.

रांका ज्वेलर्स व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., यांच्या सहयोगाने उपक्रम ४‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवारपासून (दि. २१) खालील केंद्रांवर मिळतील.

रांका ज्वेलर्स केंद्रलक्ष्मी रोड ४कर्वे रस्तासिंहगड रस्ता, भारत पेट्रोल पंपाजवळ ४रविवार पेठ.काका हलवाई स्वीट सेंटरशॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड,शॉप नं. १ अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्री, पुणे.अभिनव कला महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ.खत्रीबंधू पॉटआइस्क्रीम व मस्तानीविठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगरगंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड, शिवाजी पुतळा चौक, कोथरुडशहरातील प्रमुख केंद्रेरसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे, बालगंधर्व रंगमंदिर, पुणेयशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे‘लोकमत’ कार्यालय.

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळे