शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

महावितरणचा नखरा, वीजग्राहक मारतोय चकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:31 IST

महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही.

उरुळी कांचन : महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही. सहायक अभियंत्यावर अतिरिक्त भार देऊन सध्या या कार्यालयाचा कारभार कासवगतीने चालू आहे. त्यामुळे कामकाजाला गती नाही, ठोसपणा नाही व ग्राहकांच्या तक्रारींना न्याय नाही अशी काहीशी अवस्था या ठिकाणी झाली आहे.या कार्यालयाच्या अखत्यारीत वळती फिडर व कोरेगाव मूळ फिडर; तसेच काहीवेळा अन्य ठिकाणचा घेतलेला वीजप्रवाह ग्राहकांसाठी वापरण्यात येतो. पण, यामधून मिळणारा वीजप्रवाह हा कधीच संतुलित दाबाने ग्राहकाला मिळत नसल्याने त्याच्या टीव्ही, फ्रीज, संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जळण्याने नुकसान होत आहे.दखल नाहीमहावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाने व गैरकारभाराने ग्राहकांच्या या तक्रारीची कोणीच दाखल घेत नाही, हे वास्तव आहे. महावितरणकडून पुरविण्यात येणारा वीजप्रवाह संतुलित दाबाने पुरविला जावा, अशी मागणी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन व ननावरेवस्ती परिसरातील त्रस्त झालेले नागरिक बाळासाहेब जवळकर यांनी केली आहे.उरुळी कांचन उपविभाग : कारभारावर ग्राहकांची नाराजीमहावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीजबिले जाण्याचा प्रकार येथे सर्रास चालू आहे. कार्यालयात वीजबिलाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना तात्पुरती वीजबिल दुरुस्ती करून मिळते, मात्र दुसºयाच महिन्यात पुन्हा चुकीचे वीजबिल त्याच ग्राहकाला मिळत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कामकाजावर तीव्र नाराजीसातत्याने वाढीव वीजबिले देणे, ती दुरुस्त करण्यास विलंब करणे किंवा ही माहिती आणा, ती माहिती आणा म्हणत हेलपाटे मारायला लावणे, वीजपुरवठ्यातील सतत होणारा खंड, कोणत्याही प्रकारच्या तक्रार निवारणास विलंब वा टाळाटाळ, नवीन वीजकनेक्शनसाठी कार्यालयात माराव्या लागणाºया फेºया, अनामत रक्कम भरूनदेखील वीजजोड देण्यात होणारा विलंब, ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी पाहावी लागणारी १५ दिवस ते महिनाभराची वाट, अशा विविध समस्यांमुळे येथील वीज ग्राहकांनी महावितरणच्याअधिकारी व कर्मचाºयांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPuneपुणे