शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Harshvardhan Patil: एसटी महामंडळाच्या बिकट परिस्थितीला महाविकास आघाडी सरकारचं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 15:01 IST

(ST Strike) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या तात्काळ मान्य करून तोडगा काढावा

बारामती : एसटी महामंडळाचे (St Mahamandal) राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचारी संघटनेने केलेल्या इतर मागण्या रास्त आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या तात्काळ मान्य करून तोडगा काढावा. एसटी महामंडळाच्या सध्याच्या बिकट परिस्थितीला राज्य शासन जबाबदार असल्याची टीका भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

इंदापूर एसटी आगार येथे रविवारी हर्षवर्धन पाटील यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. इंदापूर येथील एसटीचे कर्मचारी दि.४ नोव्हेंबर पासून आपल्या मागण्यासाठी संपावर गेले आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांना सादर केले. 

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. एसटी कर्मचारी हे राज्यातील जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. कोरोना काळात सेवा बजावत असताना राज्यातील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांचे निधन झाले. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आर्थिक कुचंबणा होऊ लागल्याने एसटीच्या सुमारे ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळाच्या सध्याच्या बिकट परिस्थितीला राज्य शासन जबाबदार असल्याचा, आरोप यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केला. आपल्या रास्त मागण्या मान्य होईपर्यंत संप (ST Strike) चालूच राहील असा निर्धार यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Baramatiबारामतीharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलST Strikeएसटी संपPuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी