शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:19 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती.

ठळक मुद्देपहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगापोलिसांनी ठेवला होता चोख बंदोबस्त, १७० पोलीस कर्मचारी, २८ अधिकारी तैनात

भीमाशंकर : ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संतोष कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरूजी, आशिष कोडिलकर, प्रसाद गवांदे, मयूरेश कोडिलकर यांच्या वेदपठनात ही पूजा पार पडली.  महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन घेणे पवित्र मानले जात असल्याने अनेक भाविक रात्री मुक्कामी आले होते. सकाळच्या दर्शनासाठी सात वाजेपर्यंत रांग लागली होती. यावर्षी यात्रेत आबालवृद्धांपेक्षा तरुणवर्ग मोठ्या संख्येने दिसत होता. मुंबईच्या उपनगरांमधून पायी कोकण घाट चढून भीमाशंकरमध्ये मोठ्या संख्येने तरुण आलेले दिसत होते. तसेच अनेक ठिकाणांहून आलेल्या दिंड्यांची गर्दी पाहावयास मिळाली.  पहाटे जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी दिवसभर  दिसली नाही. सकाळी १० नंतर गर्दी वाढेल, असे वाटत होते, मात्र दर्शनरांग अर्धा किलोमीटरच्या पुढेसुद्धा गेली नाही. दर वर्षी बसस्थानकापर्यंत जाणारी रांग यावर्षी मात्र पायऱ्यांच्या वर आली नाही. एकंदरीत महाशिवरात्र यात्रेस मध्यम स्वरूपाची गर्दी दिसली.   

यात्रेनिमित्त बसस्थानक ते मंदिर या मार्गावर प्रसाद, बेलफुल, खाद्यपदार्थ यांची दुकाने लागली होती. भाविकांची संख्या कमी राहिल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे दुकानदार सांगत होते. तसेच, कोकणकड्याजवळील पटांगणात यात्रेचा बाजार भरला होता, येथेही गर्दी कमी दिसली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशिक्षित पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षीका तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली १७० पोलीस कर्मचारी, २८ अधिकारी तैनात करण्यात आले होते. देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त सुनील जोशी, देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. सुरेश कौदरे, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस हे देवस्थानच्या कार्यालयात व मंदिरात थांबून यात्रेचे नियोजन करत होते. एसटी महामंडळाने यात्रेनिमित्त वाहनतळ ते बस स्थानक अशा वाहतुकीसाठी ४०  मिनीबस ठेवल्या होत्या. तसेच पुणे, खेड, मंचर, नारायणगाव येथून जादा गाड्या ठेवल्या होत्या.  आरोग्य खात्याने वैद्यकीय पथक ठेवले होते. तसेच यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील हॉटेलांमधून पाण्याची व अन्नाची तपासणी केली होती. प्रत्येक हॉटेलमध्ये व घरात टिसीएलच्या बाटल्या दिल्या आहेत.

मंचर येथील बाबा अमरनाथ सेवा संघाने मोफत फराळ वाटप ठेवले होते. तसेच मंचर ते भीमाशंकर रस्त्यावर गंगापूर फाट्यावर विनायक गोविंद लोहोट यांनी  खिचडी व केळांचे वाटप केले. या भंडाºयाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरSaurabh Raoसौरभ रावBabanrao Pachaputeबबनराव पाचपुते