शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महारेरा क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या पुणे विभागातील १६२ प्रकल्पांवर महारेराची कारवाई

By नितीन चौधरी | Updated: November 8, 2023 17:53 IST

पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील १६२ प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील ३७० प्रकल्पांवर महारेराने कारवाई केली आहे. यात पुणे विभागातील १६२ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांना सुमारे ३३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी २२ लाख २० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ३७० प्रकल्पांमध्ये मुंबई विभागातील १७३ प्रकल्पांचा समावेश आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांत गुंतवणूक करू नये, असे आवाहन महारेराने केले आहे.

पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील १६२ प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १०१ प्रकल्पांनी महारेरा नोंदणीक्रमांक न छापल्याने ६ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी ४ लाख १० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. क्यूआर कोड न छापणाऱ्या ६१ प्रकल्पांना ३ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येऊन १ लाख २५ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.मुंबई विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकणचा समावेश आहे. विभागात महारेरा क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या ८९ प्रकल्पांचा आणि क्यूआर कोडशिवाय जाहिराती छापणाऱ्या ८४ प्रकल्प अशा एकूण १७३ प्रकल्पांना दंड ठोठावण्यात आला आहे. नोंदणीक्रमांक न छापणाऱ्या प्रकल्पांना १४ लाख ७५ हजार आणि क्यूआर कोड नसलेल्यांना ५ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी अनुक्रमे ११ लाख ७५ हजार आणि २ लाख १० हजारांची वसुली महारेराने केलेली आहे. विदर्भ, मराठवाड्याचा समावेश असलेल्या नागपूर विभागात ३५ प्रकल्पांवर कारवाई करून ३ लाखाचा दंड ठोठावून दंडाची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे.

या जाहिरातीत वर्तमानपत्रातील जाहिरातींशिवाय इंस्टाग्राम , फेसबुक , वेबसाइट, यूट्यूब या समाज माध्यमावरील जाहिरातींचे प्रमाणही मोठे आहे. स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प (यात प्लाॅटसचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. हारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री करता येत नाही. तसेच १ ऑगस्टपासून प्रकल्पांचा ग्राहकांना अपेक्षित असलेली माहितीचे क्यूआर कोड छापणेही महारेराने बंधनकारक केलेले आहे. तरीदेखील काही विकासक या निर्देशांकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय जाहिराती छापत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले. याची महारेराने गांभीर्याने नोंद घेतली आणि अशा प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या जातात. ग्राहकांनी देखील फक्त महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करण्याची काळजी घ्यायला हवी ,असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे