शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन’ नृत्याचा सुंदर आविष्कार; जिंकली पुणेकरांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:34 IST

सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकरावा काश्मीर महोत्सव सोहळा रंगला.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरहून आलेल्या ३० कलाकारांनी सादर केली आपली कलाकाश्मिरी व्हॅलीतून आलेल्या नृत्यांगणांनी पुणेकरांना करून दिली रोफ नृत्य प्रकाराची ओळख

पुणे : महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन नृत्याचा सुंदर आविष्कार... ५६ वर्षांच्या नृत्यांगना यांचे काश्मिरी वाद्यांच्या पार्श्वभूमीवर रंगलेले नृत्य... काश्मीरचा पारंपरिक महिलांसाठीचा खास असा रोफ नृत्य प्रकार.. आणि ‘भांड पथर’ हा अस्सल काश्मिरी कला प्रकार आज संध्याकाळी पुणेकरांनी अनुभवला!सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकराव्या काश्मीर महोत्सवात हा सोहळा रंगला. अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात खास जम्मू-काश्मीरहून आलेल्या ३० कलाकारांनी आपली कला सादर केली. सरहद शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन आणि काश्मिरी नृत्यप्रकार सादर केले. रमजान व इतर सण-समारंभात आवर्जून केल्या जाणाऱ्या रोफ नृत्य प्रकाराची ओळख पुणेकरांना काश्मिरी व्हॅलीतून आलेल्या नृत्यांगणांनी करून दिली.रबाब, सारंगी, मटका, तुंबकनाडी, शहनाई आदी वाद्यांचे सुरेल स्वरही पुणेकरांना या महोत्सवात ऐकायला मिळाले. गुलाम रसूल भट, आमिर अहमद, अब्दुल शेख, गुलबर्ग, मंजूर अहमद, निसार अहमद, मोहम्मद मकमुल आदी कलाकारांनी आपली कला या महोत्सवात सादर केली. या वेळी जम्मू-काश्मीर कला-संस्कृती-भाषा अकादमीचे समन्वयक शब्बीर भट, रोफ डान्स ग्रुप आॅफ काश्मीरचे गुलजार भट, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, सरहदचे संजय नहार, सुषमा नहार व अन्य मान्यवर उपस्थित होते. जाहिद भट यांनी निवेदन केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPuneपुणे