फ्लॅॅट खरेदी करताना ग्राहकांच्या मनात धाकधूक असते. आपण विकत घेत असलेला फ्लॅॅट अगोदर कोणाला विकला गेला तर नाही ना अशी भीती असते. मात्र, आता महारेराच्या साईटवर फ्लॅॅटची कुंडलीच दिसणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. घर खरेदी करताना ग्राहकांसाठी रेरा (RERA) कायद्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
कोट
हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. महारेरामुळे अनेक गैरप्रकारांना चाप बसला आहे. विशेषतः पहिले घर घेणारे मध्यमवर्गीय ग्राहक यामध्ये प्रामुख्याने फसवले जात होते. त्या फसवणुकीवर या नियमामुळे अंकुश बसणार आहे.
- सतीश कोकाटे, संचालक, फॉर्च्युन ग्रुप
महरेराच्या संकेतस्थळामुळे ग्राहकांना विकसकाबद्दलची अधिकृत माहिती मिळवणे सोपे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये घरबसल्यासुद्धा विविध गृहप्रकल्पांची माहिती घेणे सोयीस्कर आहे. तसेच आता या नव्या नियमाृमुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला पूर्णपणे आळा बसणार आहे.
अमित मोडगी, संचालक, श्री व्यंकटेश बिल्डकॉन प्रा. लि.