शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये पुणे केंद्रातून 'आकार' प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 10:25 IST

५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यमंडळ या संस्थेच्या कुलकर्णी आणि कंपनी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली.

पुणे - ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यमंडळ या संस्थेच्या कुलकर्णी आणि कंपनी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. रंगशीला या संस्थेच्या पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिगदर्शनासाठी प्रथम क्रमांक प्रियांका चांदेरे (आकार) यांना मिळाला आहे तर द्वितीय क्रमांक संतोष माकुडे (पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त) यांना जाहीर झाला आहे. 

प्रकाश योजनेसाठी वैभव नेवसकर (आकार) यांना प्रथन क्रमाकं तर  सुबोध राजगुरू (मुंबई मान्सून) साठी द्वितिय क्रमांक मिळाला आहे. नेपथ्यासाठी प्रथम क्रमांक अश्विनी करंदीकर (आकार), द्वितीय क्रमांक अजिंक्य गोखले (कुलकर्णी आणि कंपनी) यांना मिळाला आहे. रंगभूषेसाठी प्रथम क्रमांक वृषाली वडनेरकर (शामपट) यांना तर द्वितीय क्रमांक नरेंद्र वीर (येऱ्या गबाळ्याचे काम नोहे) यांना मिळाला आहे. 

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक जयदीप मुजुमदार (मुंबई मान्सून), जान्हवी देशपांडे (आया सावन झूम के) यांना जाहीर झालं. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : उन्नती कांबळे (येऱ्या गबाळ्याचे काम नोहे), रश्मी देव (शामपट), मुक्ता लेले (मुंबई मान्सून), श्रेया गोफणे (आती रहेगी बहारे), अभिजित केळकर (आकार), संकेत जोशी (कुलकर्णी अँड कंपनी), चिन्मय संत (पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त) यांना जाहीर करण्यात आली आहेत.

६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विष्णू पुरीकर, राजेंद्र जोशी आणि मालती भोंडे यांनी काम पाहिले.