शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:07 IST

विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा

- हिरा सरवदे पुणे :महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाही. कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया, ऑलंपीक, कॅमनवेल्थ आणि वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मातीतील कुस्ती ही महाराष्ट्रात खूप प्राचिन काळापासून लोकप्रिय आहे. कुस्ती आपला पारंपारिक खेळ असून आखाड्यांची मोठी परंपरा आहे. या परंपरेतून अनेक पैलवान तयार होतात. पुणे हा पैलवानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे.

आपल्या पैलवानासांठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. विविध पुरस्कार मिळवणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ केली आहे. यामागे अधिकाधीक मल्ल तयार झाले पाहिजेत, अशी भावना आहे. मात्र, एका गोष्टीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाहीय.या दृष्टीने आपणास अधिक काय करता येईल, वेगळ्या प्रकारचे काय प्रशिक्षण असावे, याचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार सुद्धा पुढाकार घ्यायला तयार आहे. मात्र, कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया , ऑलंपीक, कॅमनवेल्थ, वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस