शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना वाचनाची गोडी लावा , महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:53 IST

शाळेत स्नेहसंमेलनाप्रमाणे साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना ग्रंथरुपी भेट द्यावी, लेखकांच्या भेटीगाठी घडवून आणणे, अशा उपक्रमांमधून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून देता येते.

पुणे -  शाळेत स्नेहसंमेलनाप्रमाणे साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना ग्रंथरुपी भेट द्यावी, लेखकांच्या भेटीगाठी घडवून आणणे, अशा उपक्रमांमधून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून देता येते. मुलांमध्ये साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने शाळांना आणि पालकांना केले आहे.परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘मुलांच्या गतिमान जीवनशैलीत खेळाला आणि अवांतर वाचनाला अजिबात स्थान नाही. या मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेतर्फे सर्वतोपरी मदत यासाठी केली जाईल.’’शाळा सुरू होण्यापूर्वीची राष्ट्रगीतानंतरची दहा मिनिटे या उपक्रमासाठी द्यावी, या दहा मिनिटांत दररोज शिक्षकांनी मुलांना एक कविता, एक कथा, पुस्तकातील काही भाग किंवा मान्यवर लेखकाचे जीवनचरित्र वाचून दाखवावे, शाळेतील एखादे शिक्षक रजेवर असतील तर त्यांच्या तासालाजाणाऱ्या शिक्षकांनी वर्गात पुस्तकांची पेटी घेऊन जावी. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी द्यावे, मुलांनी काय वाचले हे लिहिण्यासाठी त्यांना स्वतंत्र वही करायला सांगून त्यात त्या पुस्तकाविषयी लिहायला सांगावे. उत्तम नोंदी ठेवणाºया मुलांना प्रोत्साहन द्यावे, दर तीन/सहा महिन्यांनी या बालवाचकांचे वाचक संमेलन घ्यावे, दरवर्षी शाळेत स्नेहसंमेलनाला जोडून विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना शाळेतर्फे जी पारितोषिके दिली जातात ती ग्रंथरूपात द्यावीत.पालकांचा सहभाग कसा असावा?सोसायटीत मुलांसाठी वाचक पेट्या असाव्यात, असा आग्रह सोसायट्यांकडे धरावा. वर्षात मुलांच्या आवडीची २० पुस्तके खरेदी करावीत.आठवड्यातून किमान एक तास पालकांनी मुलांबरोबर सहवाचन करावे. समवयस्क मित्राच्या वाढदिवसाला ग्रंथचे भेट देण्याचा आग्रह धरावा. सोसायटीतल्या मुलांची वाचकभिशी करून त्यात त्यांना वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलायला सांगा.जास्तीत जास्त पुस्तके वाचणाºया मुलांना वैयक्तिक आणि सोसायटीतर्फे पारितोषिके द्यावीत.साहित्य परिषदेची मदतमुलांनी कोणती पुस्तके वाचावीत, याची यादी उपलब्ध करून दिली जाईल. शाळांमध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम राबवण्यासाठी मदत करेल. बालवाचक संमेलन आणि स्नेहसंमेलनांना जोडून मुलांसाठी साहित्य संमेलन घेण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल.आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी बालवाचक पालकत्व योजना राबवण्यासाठी मदत करेल.प्रत्येक शाळेतील शाळेने नोंद ठेवून शिफारस केलेल्या विद्यार्थी वाचकांना ‘उत्तम वाचक’ म्हणून प्रमाणपत्र देईल. मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत, यासाठी प्रयत्न करणाºया शाळांचा आणि सोसायट्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. अशा शाळांना ग्रंथाच्या रूपाने मदत करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी