शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाकर मांडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:54 IST

‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे  संशोधक आहेत.

ठळक मुद्देमसापचा ११२ वा वर्धापनदिन : प्रा. राजा शिरगुप्पे यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारलोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल गौरव पिंपरी-चिंचवड शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार 

पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे  संशोधक आहेत. डॉ.मांडेंनी लोकसाहित्य परिषदेची स्थापना करून लोकसाहित्याच्या अभ्यासकांना प्रोत्साहन दिले. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला समाधान वाटत आहे’, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कसदार लेखन करताना महाराष्ट्रातील साहित्यासह सर्व चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे लेखक-कार्यकर्ता आणि विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू म्हणून प्रा. राजा शिरगुप्पे महाराष्ट्राला परिचित आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांच्या संवेदनांशी एकरूप होऊन त्यांचे मनोबल वाढविणारा कार्यकर्ता म्हणून शिरगुप्पे यांची वेगळी ओळख आहे. लेखक- कार्यकर्ता या नात्याने वाङ्मयीन चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परिषदेच्या डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. -----------------पिंपरी-चिंचवड शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या पिंपरी-चिंचवड शाखेला दिला जाणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रवींद्र बेडकिहाळ (फलटण) आणि गिरीश दुनाखे(सोलापूर) यांना २७ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा समारंभ सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशी