शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कवच, ६० जणांची प्रशिक्षित टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:15 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या प्रशिक्षित ६० जवानांच्या सुरक्षेचे कवच नव्याने लाभले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या प्रशिक्षित ६० जवानांच्या सुरक्षेचे कवच नव्याने लाभले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच १० युवती सुरक्षारक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, विद्यापीठात राडारोडा आणून टाकणे, चोऱ्या अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ४०० एकरचा मोठा कॅम्पस आहे. या कॅम्पसच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाचा स्वत:चा सुरक्षा विभाग आहे. सुरक्षा विभागामध्ये लष्करातील निवृत्त अधिकारी व जवान कार्यरत आहेत. त्याचबरोबर सुरक्षा विभागाचे संचालक म्हणून निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.पोलीस भरतीमध्ये प्रतीक्षा यादीत आलेल्या जवानांची महाराष्टÑ सुरक्षा मंडळामध्ये निवड करण्यात करण्यात येते. त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले जाते. २५ ते ३० वय असलेले हे जवान आता विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बल ही मुंबईमध्ये मेट्रो, विमानतळ, टाटा रुग्णालय, मोनो रेल याबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांना सुरक्षा पुरवते.विद्यापीठच्या आवारात एका प्रेमी युगुलाने विद्यापीठच्याच एका सुरक्षारक्षकाची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे प्रयत्न करण्यात आले.खासगी ठेकेदारांचे तसेच औद्योगिक सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांची सेवा विद्यापीठाकडून घेतली जात होती. मात्र, महाराष्टÑ सुरक्षा दलाचे जवान विद्यापीठासाठी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.ठगेगिरी करणाºयांवर ठेवणार वॉचसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाºया मुलांना मारहाण करण्याचे प्रकार कॅम्पसमध्ये अनेकदा घडले आहेत.त्याचबरोबर रात्रीच्या वेळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून वसतिगृहाकडे चाललेल्या विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही घडले आहेत.अशी ठगेगिरी करणाºयांवर महाराष्टÑ सुरक्षा मंडळाचे प्रशिक्षित जवान वॉच ठेवणार आहेत. विद्यापीठ कॅम्पसमध्ये दिवस-रात्र ते गस्त घालणार आहेत.।विद्यार्थिनींना मोठा दिलासा : पोलीस दलात तसेच अगदी लष्करातही महिला समर्थपणे त्यांची जबाबदारी पेलू लागल्या आहेत. यापर्श्वभूमीवर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागातही युवतींना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना त्यांचा मोठा आधार मिळणार आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी होणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी या महिलारक्षकांची मोठी मदत होऊ शकेल.

टॅग्स :Puneपुणे