शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; अनिल अवचट यांना जीवनगौैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 07:00 IST

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना

पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार अरविंद गुप्ता यांना दिला जाईल. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल.याशिवाय, सई परांजपे यांच्या ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. अजित दळवी यांना ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती विनोद शिरसाठ, मुकुंद टाकसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षासाठी एकूण ९ पुरस्कार दिले जाणार असून, त्यात साहित्यासाठी चार, समाजकार्यासाठी चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. समाजकार्यासाठी असंघटित कष्टकºयांसाठी केलेल्या कामासाठी साताºयातील चेतना गाला सिन्हा, मुस्लिम महिलांच्या प्रबोधनासाठी नागपूरच्या रुबिना पटेल, भटके विमुक्त व दलितांसाठी केलेल्या संघर्षासाठी अहमदनगर येथील अरुण जाधव यांना गौैरवण्यात येईल. या पुरस्कारांचे संयोजन केशव गोरे स्मारक ट्रस्ट व साधना ट्रस्ट यांनी संयुक्तपणे केले आहे.

टॅग्स :Puneपुणे