शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

सीसीटीएनएस सर्चमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

पुणे : पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे या करता आय. सी. जे. एस व सीसीटीएनएस ...

पुणे : पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे या करता आय. सी. जे. एस व सीसीटीएनएस सर्च या प्रणालीची महत्वाची मदत होते. यामध्ये सीसीटीएनएसला इम्लिमेंटेशन ऑफ आय. सी. जे. एस ॲन्ड सीसीटीएनएस सर्च या वर्गवारी देशभरातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या प्रणालीच्या सहाय्याने महाराष्ट्र पोलिसांनी १५७३ गुन्हे उघडकीस आणले असून ७४३ चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध, ६९३ हरवलेल्या व बेवारस मृत्युंचा शोध लावला. त्याचबरोबर ७ हजार ८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही, ५०७ प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले आहे. त्याचबरोबर १३ हजार ७२१ व्यक्तींची पडताळणी करण्यात आली असून त्यात ४ हजार ६०१ व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंद असल्याचे मिळून आले आहे. एकूण १ लाख १७ हजार २६ पारपार्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणामध्ये २ हजार ८३७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके, उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संभाजी कदम, अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे, उपअधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे, उपनिरीक्षक शशिकला काकरे, प्रमोद जाधव, पोलीस हवालदार जावेद खान, पोलीस कर्मचारी किरण कुलकर्णी, संदीप शिंदे, प्रियांका शितोळे, कीर्ती लोखंडे यांनी केली.

........

याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे संगणक विभागातील पोलीस अधीक्षक संभाजी कदम यांनी सांगितले की, सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे. त्यात देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. एखाद्या आरोपी अथवा व्यक्तीची पडताळणी करायची असले तर त्या व्यक्तीविरुद्ध देशभरात कोठे, कोणता गुन्हा दाखल आहे का याची माहिती एका क्लीकवर मिळते. त्याद्वारे गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना, तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सध्यस्थिती याविषयीची माहितीची सुविधा या प्रणालीमध्ये अदययावत आहे. गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपाेर्ट/ चारित्र्य पडताळणी, वाहनांबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणीची सर्व माहिती या प्रणालीवर उपलब्ध आहे. या प्रणालीचा देशभरात महाराष्ट्रातील पोलिसांनी गुन्हे तपासामध्ये सर्वाधिक वापर करुन गुन्हे उघड करण्यात यश मिळवले आहे.