शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

Maharashtra Election 2019 : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल उभारणार   : जगदीश मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:56 IST

वडगावशेरी : वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.. तो सोडवण्यासाठी अनेक मार्गानी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कॉमर्स झोन ते सावंत पेट्रोल ...

वडगावशेरी : वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.. तो सोडवण्यासाठी अनेक मार्गानी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कॉमर्स झोन ते सावंत पेट्रोल पंप असा महत्त्वपूर्ण रस्ता केला. या परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल उभारणार असल्याचे मत आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.  वडगावशेरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप  आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज  बरमाशेल, फायू नाईक चौक, टिंगरेनगर, सिद्धेश्वरनगर, सावंत पेट्रोल पंपच्या आणि  भीमनगरमध्ये  पदयात्रेद्वारे प्रचार केला.  या वेळी भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक कर्णे गुरुजी, नाना सांगडे, शीतल सावंत, राहुल भंडारे, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, विशाल साळी, सुधीर गलांडे, माजी नगरसेवक भगवान जाधव, भीमराव खरात, सागर माळकर, सुनील गोगले, अजय सावंत, अजहर खान आदी उपस्थित होते........मुळीक म्हणाले, कामामुळे तसेच अनेक कारणांमुळे नागरिकांना व्यायाम करता येत नाही. व्यायामशाळेत जाणे आर्थिकदृष्ट्या परवड नाही. या ओपन जिममध्ये अनेक प्रकारचे व्यायाम करता येत आहे. या जिमचा वापर तरुण, महिला तसेच वयोवृद्ध करत आहेत. व्यायामामुळे मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य सुधारणार आहे.त्यामुळे नागरिकांना मोफत व्यायाम करता यावा यासाठी उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी शेकडो ओपन जिम सुरू केले आहेत. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते. मनातील व शरीरावरील ताणतणाव कमी होतो. 

 

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीvadgaon-sheri-acवडगाव शेरीJagdish mulikजगदीश मुळीकElectionनिवडणूकPoliticsराजकारण