शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा : योगी आदित्यनाथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 19:03 IST

 राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते.

ठळक मुद्देशिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीतपाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण

लोणावळा : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टिका केली.

   यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर, रिप‍ाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

योगी म्हणाले,  राजकारणात कार्यकर्ते अनेक व तिकीट एक असते, त्यांच्यामध्ये तिकीट मिळविण्याकरिता निकोप स्पर्धा असते. मात्र संधीसाधू व्यक्ती ह्या राजकारणात स्वार्थासाठी पक्ष बदलतात त्यांना उद्या कोणी काही लालच दाखविल्यास ते महाराष्ट्राच्या विरोधात देखिल उभे होतील अशा स्वार्थी व संधीसाधू राजकारण्यांना घरी बसवावे. राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मुल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले. महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुध्द कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेहले आहे.

     राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिध्दांतहिन राजकारण म्हणजे मृत्युचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. ह्या निवडणुकीत देखिल ह्या मुल्यांची जपणूक केली जाणार आहे. भाजपा शिवसेना रिपाईच्या सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकारणाला आळा घालण्याचे काम केले आहे. पाच वर्षापुर्वी देशात व राज्यात आतंकवाद व दहशतवाद माजला होता, आज पाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

     राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाडा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणार्‍यांनी समोर येऊन बसावे असे आवाहन विरोधकांना केले. मी शिवरायांचा मावळा आहे, राजकारण निष्ठेने करतो, फसवा फसवी माझ्या रक्तात नाही, मावळातील जाधववाडी येथिल जमिनीचा प्रश्न, पवना धरण बाधितांचा जमिनीचा प्रश्ना, रिंगरोड, कार्ला व नवलाख उंब्रे एमआयडीसीचा विषय ही अनेक वर्षाची रखडलेली कामे मार्गी लावली. शेतकर्‍यांची जमिन शेतकर्‍यांना परत देण्याची भावना असावी लागते, ती आमच्याकडे होती म्हणून विषय मार्गी लागले. पवना जलवाहिनीचे राजकारण नाही केले तर शहिदांच्या वारसांना नोकर्‍या दिल्या, 179 शेतकर्‍यांवर दाखल झालेले गंभिर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले. भविष्यात देखिल शेतकर्‍य‍ांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द यावेळी मावळवासीयांना दिला.    नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सुनिल शेळके यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपिठावर आलेल्या माकडाचे उदाहरण देत वाघमारे म्हणाले माकडाला निष्ठा कळते पण एका ताटात खाणार्‍यांना निष्ठा कळत नाही. मावळात उड्या मारणार्‍या ह्या माकडाला थांबविण्याचे आवाहन भाजपाप्रमाणे शिवसैनिक व भिमसैनिकांनी स्विकारले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाElectionनिवडणूकPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथmaval-acमावळ