शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: प्रचाराची रणधुमाळी शिगेला ; आता उरले ७२ तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 13:16 IST

विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी प्रचाराची रंगत वाढू लागली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आज पुण्यात, मुख्यमंत्री बारामतीत

पंतप्रधान मोदी आज पुण्यात, मुख्यमंत्री बारामतीतपुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. मतदान २१ ऑक्टोबरला होत असून प्रचार संपण्यास (दि. १९) आता केवळ ७२ तास म्हणजे फक्त तीनच दिवस उरले आहेत. त्यातच पंतप्रधान गुरुवारी पुण्यात येत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची बारामतीत सभा होत आहे.विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी प्रचाराची रंगत वाढू लागली. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. युती व आघाडी यांच्यात लढत आहे. तरीही पुणे जिल्हा हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्याला खिंडार पाडण्यासाठी युतीने कंबर कसली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री, तर शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बारामतीत सभा आहे. माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर हेलिपॅडचे काम सुरू आहे. गुरुवारीच मुख्यमंत्र्यांची दौंड व इंदापूरला सभा होत आहे कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने जिल्ह्यातून सर्वच मतदारसंघांचे गावभेटीचा धडाका लावला आहे. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रचारसभा घेण्यात दंग आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच वर्षांत सत्ताधाºयांनी कोणते प्रश्न सोडवले, याची विचारणा ते करीत आहेत. वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी बारामतीत सभा झाली. त्यांनी विरोधकांना धारेवर धरत सत्तेसाठी ‘वंचित’ने चंग बांधल्याचे सांगितले............

सप महाविद्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूपआता उरलेल्या तीन दिवसांत युती व आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा जिल्हाभर होणार आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच मोठ्या गावांत पोलिसांनी संचलन केले व गुन्हेगारांना जरब बसवली. कामगार व नागरिकांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावे, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. कामगार आयुक्तांनी मतदानादिवशी पगारी सुटी जाहीर केली आहे. मतदानासाठी कामगारांना सुटी देण्याच्या सूचना कंपनी, कारखाने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

सप महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची गुरुवारी सभा होत असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सभेसाठी पावसाच्या शक्यतेमुळे वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे काम गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांचा वेढा असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019