शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 07:00 IST

Maharashtra Vidhan Sabha Election : मागील काही निवडणुकांमध्ये मनसेला आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांची केलेल्या कामांचा होईल फायदामनसेचे एकेकाळी पुण्यात 29 नगरसेवक आले होते निवडून; परंतू, ही संख्या एकदम दोनवर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच जागा लढविण्यात येत आहेत. पक्षाला मागील काही निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील दोन-अडीच वर्षात बांधलेली पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवर नागरिकांची केलेली कामे यामुळे निवडणुकीमध्ये चांगला फायदा होईल, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.मनसेचे एकेकाळी पुण्यात 29 नगरसेवक निवडून आले होते. परंतू, ही संख्या एकदम दोनवर आली. तरीही पक्ष नेते आणि कार्यकर्ते निराश होऊन बसले नाहीत. सातत्याने पक्षबांधणीवर भर देण्यात आला. त्यासाठी शाखा स्तरापासून विभागापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. संपर्काचे जाळे निर्माण करण्यात आले. शहरप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी आहे. पक्ष वाढीसाठी एक मतदार संघ आठवड्याचा एक दिवस याप्रमाणे नियोजन केले होते. त्यातूनही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढला. या निवडणुकीमध्ये पक्ष नेते बाबू वागस्कर, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, गणेश सातपुते यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नियोजनाची जबाबदारी स्विकारलेली आहे. त्यांनी विभागून घेतलेल्या जबाबदारीमुळे प्रचार यंत्रणा सुरळीत सुरु आहे. सर्व मतदार संघांमधील प्रचाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. दररोज रात्री सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची एकत्र समन्वय बैठक होते. या बैठकीमध्ये दिवसभरातील कामकाज, प्रचार यंत्रणा आणि नियोजनासंदर्भात झालेल्या चर्चेनुसार दुसºया दिवशीचे नियोजन केले जाते. त्याचाही चांगला फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले, नागरिकांशी थेट बोलणी आणि भेटी-गाठी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, छोट्या पदयात्रा, रॅली असे प्रचाराचे स्वरुप आहे. प्रचाराची प्रमुख भिस्त ही राजसाहेब ठाकरे यांच्यावर आहे. त्यांच्या सभांचा पुण्यामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. त्यांना माननारा एक वर्ग असून मनसेचा हक्काचा मतदार सुद्धा आहे. त्यांनी शहरामध्ये तीन सभा दिल्या असून कसबा, कोथरुड आणि हडपसरमध्ये या सभा झाल्या आहेत. पुण्यात मनसेमुळे परिवर्तन झाल्याचे पहायला मिळेल. स्थानिक पातळीवर मनसेचे कार्यकर्ते नागरिकांची सर्व प्रकारची कामे करतात. त्यामुळे बराचसा फरक पडत आहे. पक्ष उभा करत असतानाच कार्यकर्ताही उभा राहात आहे. पक्षाची बांधणी लाटेवर होत नसल्याने या बांधणीसाठी वेळ जातो. मागील काही वर्षात मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ पुण्यातील यशाच्या रुपाने दिसणार असल्याचे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेpune-pcपुणे