शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : दौंडमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई’: रमेश थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:37 IST

आमदार राहुल कुल यांच्या विरोधात परिवर्तनाची सुप्त लाट पसरली आहे..

दौैंड : भीमा-पाटस कारखान्याची वाट लावणारे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्या विरोधात परिवर्तनाची सुप्त लाट पसरली असून, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार असल्याचे मत राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी खडकी (ता. दौैंड) येथे जाहीर सभेत व्यक्त केले.  तालुक्यात ठिकठिकाणचे ग्रामस्थ रमेश थोरात यांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहेत. त्यानुसार खडकी येथील युवकांनी पैसे गोळा करुन ११ हजारांचा निधी थोरात यांना दिला. तर काही गावांमध्ये घरटी हजार, पाचशे रुपये दिले जात आहेत.  रमेश थोरात म्हणाले, भीमा पाटस कारखान्यावर सध्याच्या परिस्थितीत ४00 कोटी रुपयांच्या जवळपास कर्ज आहे. गेल्या काही वर्षांपासून कामगारांचे पगार थकलेत तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैैसे थकीत असून, एफआरपी देखील मिळालेली नाही. एका ट्रॅक्टरवर चार बँकांचे कर्ज काढून कारखान्याच्या अध्यक्षांनी बँकांची फसवणूक केली आहे. अजून कुणाकुणाची फसवणूक करणार? असाही प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. मी कारखान्यात असताना कारखान्यावर ३८ कोटींचे कर्ज होते. तर कारखान्याकडे ७५ कोटींची साखर शिल्लक होती.  इतर कारखान्यांच्या तुलनेत उसाला भाव दिला जात होता. तर कामगारांचे पगार आणि सभासद शेतकºयांची देणी वेळेवर दिली गेली. मात्र आता सध्या कारखाना बंद आहे. याला जबाबदार कुलच आहेत. ..........

कारखान्याचे खापर इतरांवर फोडू नये...वेळेवर पगार होत नसल्यामुळे भीमा-पाटसच्या काही कामगारांना तालुक्यातच भाजीपाला विकावा लागत आहे तर काही  रिक्षा चालवत आहेत, नेमके याला जबाबदार कोण?  हे तालुक्याला माहीत आहे. ज्याला कारखाना न्ीाट चालवता आला नाही त्याने अपयशाचे खापर इतरांवर फोडू नये असे रमेश थोरात म्हणाले. ......

टॅग्स :daund-acदौंडElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस