शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाची राहणार काटेकोर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:45 IST

भरारीपथके तैनात : गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी लागणार;

ठळक मुद्दे समितीच्या माध्यमातून उमेदवारांच्या व्यवहारांवर लक्ष

प्रकाश गायकर-   पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाच्या वतीने काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. २८ लाखांपेक्षा जास्त खर्च उमेदवारांना करता येणार नाही. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीही उमेदवारांना जाहीर करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये उमेदवाराने व राजकीय पक्षातील व्यक्तीने काय करावे व काय करू नये याची यादी देण्यात आली आहे. त्यानुसारच उमेदवार व कार्यकर्त्यांना वागावे लागणार आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रचारासाठी राजकीय पक्षाकडून किती वाहने वापरण्यात येणार, किती लोक असणार. त्यासोबतच प्रचारामध्ये कार्यकर्त्यांचा नाष्टा व जेवणावर किती खर्च करण्यात आला याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. वाहने, स्टेज, जेवण आदी खर्चासाठी उमेदवाराला २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या रकमेच्या आतच उमेदवाराला खर्च करता येणार आहे. आचारसंहितेच्या काळात टीका करताना नेत्यांना व उमेदवारांना बोलताना स्वत:वर ताबा ठेवावा लागणार आहे. राजकीय धोरणाव्यतिरिक्त एखाद्याची जात अथवा धर्म यावर टीका करता येणार नाही. प्रचार करत असताना मतदारांना आमिष दाखवणे, धमकावणे हा गुन्हा ठरणार आहे. या काळामध्ये सरकार, स्थानिक महापालिका, नगर परिषदा यांना सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही. तसेच या काळामध्ये नव्या घोषणा, कामासाठी निधी जाहीर करणे व कामांचे उद्घाटने करता येणार नाही. मतदारांना प्रलोभन दाखवणे आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. त्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. 

पथकांच्या माध्यमातून वॉच कोणत्याही वस्तू, मद्य याचे वाटप होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच सभा, प्रचारफेºया, मिरवणूक यावर लक्ष ठेवण्यासाठीही पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये बँकांमधून होणाºया व्यवहारांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आयकर विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत..........रॅलीचे चित्रीकरण करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. चित्रीकरण तपासून निवडणूक आयोगाला किती खर्च झाला असेल हे कळवले जाणार आहे. फ्लाईंग स्कॉड, स्थिर पथके, फिरती पथके यांची निर्मिती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. - औदुंबर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघ

.........* आचारसंहितेतील ठळक मुद्दे  -  कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण यावर बंदी   सरकारी वाहनांचा वापर करण्यास बंदी  मतदारांना प्रलोभन दिल्यास निवडणूक रद्द  शांतता भंग पावणार नाही याची काळजी  स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला द्यावी लागणार सोशल मीडियावरील खर्चही सादर करावा लागणारहॉटेल्स व धाबे रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहणार 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग