शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 20:55 IST

सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं.

ठळक मुद्देसत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु शरद पवार सरकारवर बरसले; बळीराजाचं राज्य आणण्याचेही आवाहन

पुणे (शेलपिंपळगाव) : सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं. एवढेच नव्हे तर माझ्यावरही गुन्हा दाखल करून ईडीची चौकशी लावली. मात्र विधानसभा निवडणुकीत ही मायबाप जनता महाआघाडीला न्याय देणार आहे. त्यानंतर सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आपण सरळ करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

चाकण (ता.खेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, आरपीआय (गवई गट) व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते - पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार तथा आघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील, प्रदीप गारटकर,राम कांडगे, जयदेव गायकवाड,  रामदास ठाकूर,  अनिल राक्षे, ऋषिकेश पवार, राजाराम लोखंडे, एस.पी. देशमुख, डी. डी. भोसले, बाळशेठ ठाकूर,  सुगंधा शिंदे, निर्मला पानसरे, दीपाली काळे, चंद्रकांत इंगवले आदी उपस्थित होते़.

मोहिते पाटील म्हणाले, मागील पाच वर्षे विरोधी उमेदवार दादागिरी करून तालुक्याला एकत्र लुटत होते. सत्तेच्या माध्यमातून कारखानदारीतील अनेक ठेके मिळवले. ज्यांना स्वत:च्या घराकडं जाणारा रस्ता करता आला नाही, त्यांनी तालुक्याचा विकास सांगु नये. दरम्यान बाबा राक्षे, रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार आदींनी मोहिते पाटलांना विजयी करण्याची ठाम ग्वाही शरद पवारांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे तर आभार कैलास सांडभोर यांनी मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस