शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 15:30 IST

Baramati Election 2019 : बारामतीत ठरले कौतुकाचा विषय..

ठळक मुद्देविधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासुन त्यांनी आजपर्यंत एकही मतदान चुकविले नाही.

बारामती : बारामती शहरातील एमईएस हायस्कुलच्या मतदारसंघात स्वत: कार चालवित मतदानासाठी पोहचलेले ९६ वर्षीय आजोबा कौतुकाचा विषय ठरले. शासनाने अनेक प्रयत्न करुन देखील मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांसमोर या मतदार आजोबांनी आदर्श वस्तुपाठ मांडला आहे. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासुन त्यांनी आजपर्यंत एकही मतदान चुकविले नाही. १९५० पासुन ते नियमितपणे मतदान करीत आहेत.वालचंद नानचंद संघवी असे या ९६ वर्षीय मतदाराचे नाव आहे. संघवी हे त्यांच्या ज्येष्ठ वहिनी आसावरी संघवी(वय ७५) यांच्यासमवेत मतदानासाठी आले होते. मतदान करण्यासाठी ते स्वता कार चालवत येथील मतदान केंद्रावर पोहचले. यावेळी संघवी यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. मतदानानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी संघवी यांनी सांगितले की, १९५० पासुन मी मतदान करीत आहे. दैनंदिन जीवनात आपला आहार अत्यंत महत्वपुर्ण आहे.तीन दिवसांपेक्षा तळलेले पदार्थ आहारात घेत नाही . जैन धमार्तील तत्वानुसार ते एकच वेळ जेवण करतात.त्यानंतर पाणी सुध्दा घेत नाहित. आपले आयुष्य आपल्या वागण्यावर अवलंबुन असते, अशा शब्दात संघवी यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी जपलेल्या ' फिटनेस' चे रहस्य सांगितले.नवमतदारांनी सक्षम उमेदवार पाहुन मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.संघवी बारामती जैन धर्मीय देवस्थानचे अध्यक्ष होते.तसेच त्यांनी कुंथलगिरी देवस्थान ट्रस्टचे २५ वर्ष व्यवस्थापनाचे काम  पाहिले असल्याची माहिती त्यांचे पुत्र नगरसेवक संजय संघवी यांनी दिली.

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-acबारामतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान