शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार पुन्हा सुरु करावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:32 IST

राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये हा पुरस्कार देणे बंद केले़. 

ठळक मुद्दे 'महाराष्ट्र भुषण' पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान वाढतो, अभिमान वाढतो

पुणे : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च व मानाचा सन्मान आहे. महाराष्ट्राची सर्वोच्च अस्मिता म्हणून या पुरस्कारकडे सन्मानाने पाहिले जाते. महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन... व ऐतिहासिक क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या माध्यमातून सन्मान केला जातो.राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये हा पुरस्कार देणे बंद केले़. यावर्षापासून हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यास सुरु करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे़. याबाबतचे पत्रक संभाजी ब्रिगेडचेपुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी काढले आहे़. २०२० पासून बहुजन समाजातील सुसंस्कृत व समाजाशी तसेच साहित्य, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन आदी, सरकारच्या नियमाच्या अधीन राहून महाराष्ट्रातील व्यक्तींचा या वर्षापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याची मागणी आहे.सरकारने सप्तखंजेरीवादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज, साहित्यिक व संस्कृत पंडीत डॉ. आ.ह. साळुंखे, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ह.भ. प. रामदास महाराज कैकाडी (पंढरपूर), बद्रीनाथ महाराज तनपुरे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, इत्यादी बहुजन समाजातील व्यक्तींना हा सन्मान देण्यात यावा. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ 'तज्ञ' समिती स्थापन करावी अशी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. 'महाराष्ट्र भुषण' पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान वाढतो, अभिमान वाढतो, तो तसाच अखंड महाराष्ट्रभर पुरस्कार रूपी सन्मानाने अजून वृद्धिंगत व्हावा अशी 'संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे. 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडState Governmentराज्य सरकार