शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनो २३ डिसेंबरपर्यंत खर्च करा सादर, तफावत आढळल्यास द्यावा लागणार खुलासा

By नितीन चौधरी | Updated: November 26, 2024 18:12 IST

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व ३०३ उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत ...

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व ३०३ उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाची तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. खुलासा समाधानकारक असल्यास संबंधित उमेदवाराचा खर्चाचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा होती. अर्ज भरल्याच्या दिवसापासून निवडणुकीदरम्यान सर्व उमेदवारांना टप्प्याटप्प्याने खर्चाचे हिशोब द्यावे लागत होते. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचे हिशोब निवडणूक खर्च निरीक्षकांकडे आल्यानंतर त्यांच्याकडून तपासणी करण्यात येते. त्या तपासणीमध्ये प्रशासनाकडील खर्चानुसार, उमेदवाराच्या खर्चात काही फरक आढळल्यास त्याबाबत उमेदवाराकडे विचारणा केली जाते. त्याबाबत नोटीस जारी केली जाते. त्यासंदर्भात उमेदवाराने खुलासा दिल्यास तो समाधानकारक असल्यास त्यांची बाजू ग्राह्य धरली जाते. खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्याकडे पुन्हा विचारणा होण्याची शक्यता असते. तसेच त्या उमेदवारालाही जिल्हा समितीकडे दाद मागता येते.निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चाची तीन टप्प्यांत तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेकांचे खर्चाचे हिशोब जुळत नव्हते. उमेदवारांकडे विचारणाही करण्यात आली होती. खर्चाच्या तफावतीबाबत अनेक उमेदवारांनी संबंधित निवडणूक खर्च निरीक्षकांकडे खुलासेही दिले आहेत. मात्र, आता निवडणुका पार पडल्या आहेत. निकालही जाहीर झाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम हिशेब देणे सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे.विधानसभा निवडणुकीच्या अंतिम खर्चाबाबत सर्व उमेदवारांना तपशील देण्यासाठी एका महिन्याची मुदत असते. त्यानुसार येत्या २३ डिसेंबरपर्यंत सर्व उमेदवारांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या खर्च निरीक्षकाकडे खर्चाचा तपाशील देणे आवश्यक आहे.- सोनप्पा यमगर, निवडणूक खर्च निरीक्षक

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Votingमतदान