शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:16 IST

सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे  करण्यात आले.

ठळक मुद्देवृद्धाश्रम नव्हे मातृदेवो व पितृदेवो भव ही आपली संस्कृती : बाबासाहेब पुरंदरे उच्च शिक्षणासाठी सुरतवाला फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हितसंबंध जपले गेले पाहिजे. शिवाजी महाराजदेखील सुरत लुटायला गेले नव्हते. शाहिस्तेखानाने तीन वर्षांत जे काही पुण्याचे नुकसान केले त्याची भरपाई खंडणीरूपात वसूल करण्यासाठी महाराज सुरतला गेले होते. भूतकाळातील सर्व काही घटना विसरून गुजरात व महाराष्ट्र यांनी जिव्हाळ्याचे नाते जपले पाहिजे, त्यामध्ये कोणताही वाद अस्तित्वात नसावा, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.  सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे  करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शांतिलाल सुरतवाला, नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास  गांधी, जगमोहन रंगीलदास सुरतवाला, दिनेश सुरतवाला आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले,  ‘‘वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही, तर मातृदेवो व पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे.’’ शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीतील काही लक्षणीय प्रसंग बाबासाहेबांनी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरतवाला फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र