शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महादेव जानकर यांची इंदापूर, बारामतीला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 20:02 IST

‘रासप’ कार्यकर्त्यांच्या घेतल्या बैठका; २०१४ च्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांची चांगलीच दमछाक केली होती. त्यावेळी सुळे यांना ५ लाख २१ हजार, तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार मतदान मिळाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत दाखल झाले.परभणीचे मतदान शुक्रवारी (दि २६) संपले.त्यानंतर जानकर हे पुढील राजकीय व्युहरचनेसाठी या मतदारसंघात दाखल झाले आहेत.

 जानकर हे शनिवारी (दि २७) सकाळी शिखर शिंगणापुर येथे महादेवाच्या दर्शनाला पाेहचले.त्यानंतर ते इंदापुर  तालुक्यातील निमगांव केतकी येथील एका कार्यकर्त्याच्या शेतात जानकर यांनी बैठक घेतली.या ठीकाणी असणार्या शेततळ्यात जून्या सवंगड्यांसमवेत  पोहण्याचा आनंद लुटला.त्यानंतर दुपारी जानकर हे सोमेश्वरनगरला पोहचले.येथील सोमेश्वराचे दर्शन घेतले.त्यानंतर बारामती शहरात प्रमुख कार्यकर्ते यांची ‘रासप’ कार्यालयाज बैठक घेतली.त्यानंतर  जानकर हे बीडला पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी रवाना झाले.दरम्यान दोन दिवसांनंतर जानकर हे  बारामती,इंदापुर,दाैंड,भाेर या ठीकाणी सभा घेणार आहेत,अशी  माहिती ‘रासप’ जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलतना दिली.

दरम्यान,जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपण परभणीतून विजयी होवु असा विश्वास व्यक्त केला.परभणीमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी मोठी मदत  केली.माझ्या विजयात या  तिघा नेत्यांचा मोठा वाटा असेल,असे जानकर म्हणाले.त्यामुळे माझ्यावर प्रेम करणार्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मतदान करावे,असे आवाहन जानकर यांनी यावेळी केले.२०१४ च्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांची चांगलीच दमछाक केली होती. त्यावेळी सुळे यांना ५ लाख २१ हजार, तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार मतदान मिळाले होते. सुळे यांचा अवघ्या ६९ हजार ६६६ मताधिक्क्य मिळाले होते. आता तेच जानकर महायुतीच्या बाजुने आहेत. जानकर आणि ‘रासप’च्या विचारांचा आजही या भागात मोठा प्रभाव आहे.हा प्रभाव महायुतीला कितपत उपयुक्त ठरणार,हे पाहण्यासाठी मात्र लोकसभा निकालाची वाट पहावी लागणार आहे.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरbaramati-pcबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवार