शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बाळ बोठे यांचे 'ते' पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:50 IST

Rekha Jare murder case; सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शिंदेपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी ‘लोकमत'ला सांगितले.     यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या बाळ बोठे यांचे ‘राजकीयपत्रकारिता’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिकल जर्नलिझम’ या विशेष अभ्यासक्रमासाठी (एस-2) नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षापासूनच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठासह विविध विद्यापीठात पॉलिटिकल जर्नलिझम नावाचा पेपर सुरू आहे.       नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळातील काही सदस्यांची निवड नॉमिनेशन मधून केली जाते. विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून बोठे यांचे नॉमिनेट करण्यात आले होते. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्यातील घटनेतील आरोपीला विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यापासून मज्जाव करता येतो. तसेच अशा व्यक्तीचे सदस्य पद विद्यापीठाचे कुलगुरू रद्द करू शकतात,असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

 विद्यापीठाने बाळ बोठे यांचे संदर्भ ग्रंथ म्हणून नियुक्त केलेले पुस्तक रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विद्या परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. तसेच त्यांचे अभ्यास मंडळ सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.- डॉ.नितीन करमळकर, कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण