शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जप्त आलिशान गाड्यांचा होणार लवकरच लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:05 IST

मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़.

ठळक मुद्देकुलकर्णी व त्यांच्या कंपन्यांच्या नावावर असलेल्या २४६ मालमत्ता व १७ वाहने जप्त न्यायालयाने या मालमत्तांच्या लिलावाला मान्यता दिल्यानंतर त्यांचे मुल्यनिर्धारित लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावे लागणार२१ जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी यांच्या पोलिसांनी जप्त केलेल्या आलिशान गाड्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे़. त्यासाठी जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे़. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांच्या एकूण १६ आलिशान मोटारी व एक स्पोटर्स बाईक जप्त करण्यात आली आहे़. त्यात पोर्श, बीएमडब्लू आणि एमव्ही आॅगस्टा सुपरबाईक अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे़. या गाड्या जप्त करुन सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत़. याबाबत मावळ प्रांताधिकारी सुभाष भागडे म्हणाले, कुलकर्णी व त्यांच्या कंपन्यांच्या नावावर असलेल्या २४६ मालमत्ता व १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत़. शासनाने तशी अधिसूचना काढली आहे़. त्याबाबतचे शपथपत्र विशेष न्यायाधीश आऱ. एऩ. सरदेसाई यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे़ न्यायालयाने या मालमत्तांच्या लिलावाला मान्यता दिल्यानंतर त्यांचे मुल्यनिर्धारित करण्यात येईल़. मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे़. डीएसके यांच्या मालमत्तेवर ज्यांचा बोजा आहे, अशा सर्वांना त्यांचा पैसा परत मिळू शकतो, त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे आपला क्लेम सादर करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले़. दरम्यान, कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकविले आहेत़. त्याच्या वसुलीसाठी तारण ठेवण्यात आलेली धायरी येथील डीएसके विश्वमधील गहाण मालमत्ता बँकेने लिलावात काढली आहे़. तशी जाहिरात बँकेच्या वतीने वृत्तपत्रात देण्यात आली आहे़. बँकेने या जागेचा १ जून २०१८ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे़. लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावे लागणार आहे. २१ जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.२३ जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे़.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीcarकारCourtन्यायालय