शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

सामान्यांच्या ‘उडान’ला लॅँडिंग मिळेना, परवडणारी विमानसेवा अजूनही दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली.

श्रीकिशन काळे पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली. परंतु मुंबईमध्ये या सामान्य नागरिकांसाठीच्या ‘उडान’ला लॅँडिंगसाठी जागाच उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे सामान्यांचे कमी दरात ‘उडान’ करण्याचे स्वप्न अजून तरी स्वप्नच राहिले आहे. पुणे-नाशिक-मुंबई या मार्गासाठी विमान उपलब्ध असूनही, त्याला भरारी घेता येत नाही.सामान्य नागरिकांनी विमानात बसावे, या सेवेत वाढ व्हावी, रोजगार वाढावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उडान’ या सेवेचे उद्घाटन एप्रिल २०१७मध्ये केले होते. ‘उडान’ म्हणजे ‘उडे देश का आम नागरिक’ अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे. देशात सुरुवातीला ४३ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली. त्यातील काही ठिकाणी ही सेवा सुरू झाली आहे. परंतु, महाराष्टÑात मात्र नांदेड सोडलेतर इतर ठिकाणचे ‘उडान’ अद्याप झालेले नाही.राज्यातील पुणे, नाशिक (ओझर), जळगाव, कोल्हापूर, सोलापूर येथे ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन या कंपनीला अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु, येथून ‘उडान’ करणाºया विमानांना मुंबईत लॅँडिंग करण्यासाठीचे ‘स्लॉट’ म्हणजेच जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे ‘उडान’ अद्याप ‘हवेत’च आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन कंपनीला ३० सप्टेंबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु ती संपली आहे.दरम्यान, ही सेवा त्वरित सुरू करावी यासाठी, विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील एअरपोर्ट आॅथॉरिटीचे जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मुंबईत लॅँडिंगसाठी ‘स्लॉट’ उपलब्ध होत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे लॅँडिंगसाठी जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सामान्यांचे ‘उडान’ अधांतरीच राहणार आहे.>‘मुंबई-नाशिक-पुणे’ ही सेवा तरी सुरू करावीमुंबई-नाशिक (ओझर)-पुणे या मार्गावर आता सेवा सुरू करता येऊ शकते. त्यासाठी १८ प्रवासी क्षमता असणारे एम २८ हे विमानउपलब्ध आहे. परंतु, ही सेवादेखील सुरू करण्यात आलेली नाही. ही सेवा तरी त्वरित सुरू व्हावी, अशी मागणी विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधील महानगरपालिकेच्या निवडणुकी वेळी येथील सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी विमानसेवेचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, असेही वंडेकर यांनी सांगितले.>सवलतीमध्येमिळणार तिकीटसामान्य नागरिकांसाठी ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ (आरसीएस) अंतर्गत तिकीटदरात सवलत मिळणार आहे. ‘उडान’च्या सेवेसाठी प्रथम येणाºया ५० टक्के प्रवाशांना ही सवलत मिळेल. उदाहरणार्थ- शंभर प्रवासी क्षमता असणाºया विमानात ५० प्रथम येणाºया प्रवाशांना सवलतीत तिकीट मिळेल.>गुजरातमध्ये सुरू; महाराष्टÑात का नाही ?गुजरात राज्यामध्ये भावनगर-अहमदाबाद, दिऊ-अहमदाबाद, जामनगर-अहमदाबाद, मिठापूर (द्वारका)-अहमदाबाद, मुंद्रा-अहमदाबाद या सेवा आॅगस्ट महिन्यातच सुरू झाल्या आहेत. परंतु, महाराष्टÑात मात्र मुदत संपूनही या सेवा सुरू झालेल्या नाहीत, असे धैर्यशील वडेकर यांनी सांगितले.>आरसीएमअंतर्गतविमानसेवा दरमार्ग तिकीट दरमुंबई-नाशिक-पुणे १,४२०मुंबई-कोल्हापूर १,९२०मुंबई-जळगाव २,२५०मुंबई-सोलापूर २,०८०

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ