शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात घट; पुण्यात हंगामातील निचांकी ११.५ सेल्सिअसची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 16:21 IST

राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी घट झाली आहे़. उत्तरेकडील वार्‍यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे़

ठळक मुद्देमराठवाड्यातील काही ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेनीय घट राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०़२ अंश सेल्सिअस

पुणे : राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी घट झाली आहे़ सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ उत्तरेकडील वार्‍यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे़ त्यामुळे संपूर्ण राज्यातील अनेक शहरातील पारा घसरला आहे़ अहमदनगर, सोलापूर, गोंदिया, परभणी, वेंगुर्ला यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांनी घट झाली आहे़ विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेनीय घट झाली आहे़ पुणे शहरात रविवारी या हंगामातील निचांकी ११.५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली होती़ त्यात सोमवारी किंचित घसरण होऊन ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले़ थंडी वाढल्याने शहरात अनेक ठिकाणी रात्री रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसत होत्या़ रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या काही जणांनी तेथेच एकत्र येऊन शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते़ पुढील काही दिवस तापमानातील घट अशीच कायम राहण्याची शक्यता असून १८ नोव्हेंबरला त्यात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सियस) पुणे ११.४, अहमदनगर १०.७, नाशिक १०.२, सांगली १३.६, सातारा ११.५, सोलापूर १३.१, उद्गीर १४.८, परभणी १२.५, अकोला १३.७, बुलढाणा १४.६, चंद्रपूर १६.६, गोंदिया १२.६, नागपूर १२.९, अलिबाग १८.८, अमरावती १६.२, औरंगाबाद १३, बीड ११.९, डहाणु १८.४, जळगाव १३, कोल्हापूर १५.५, महाबळेश्वर १३.६, मालेगाव १४, मुंबई १९.३, नांदेड १४.५, रत्नागिरी १७.९, वेंगुर्ला १६.७, वर्धा १३.६, यवतमाळ १२.२़

टॅग्स :Puneपुणे