शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

प्रवाशांची लूट, साथीला हाल, मनस्ताप!, जिल्ह्यात एसटीसेवा ठप्प, खासगी वाहतूकदारांची मात्र चंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:38 IST

एसटी कर्मचारी संपाच्या सलग दुस-या दिवशीदेखील बारामती आगारामध्ये शुकशुकाट कायम आहे. ऐन दिवाळीत एसटी संपामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला.

बारामती : एसटी कर्मचारी संपाच्या सलग दुसºया दिवशीदेखील बारामती आगारामध्ये शुकशुकाट कायम आहे. ऐन दिवाळीत एसटी संपामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला.याचा फायदा उचलत खासगी वाहन व्यावसायिकांनी प्रवाशांची लूट चालविली आहे. १० किमीवरील गावांसाठी २० रुपये त्यापुढील ३० किमी अंतरावरील गावांसाठी ५० रुपये तर ६० किमी अंतरावरील गावांसाठी प्रतिमाणसी १५० रुपये तिकीट आकारणी खासगी वाहतूकदारांकडून सुरू आहे.दररोज गजबजणा-या एसटी स्थानकामध्ये कमालीचा शुकशुकाट होता. सर्व कर्मचारी स्थानकामध्ये एकत्र येऊन बसत आहेत. वर्गणी काढून एकत्रित जेवण बनविले जाते.चालक, वाहकांचे विश्रामगृह केले बंदएसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आजपासून बारामती आगारातील चालक, वाहकांच्या विश्रांतीसाठी असलेले विश्रांतीगृह बंद करण्यात आले. त्यामुळे बाहेरगावाहून मुक्कामाला आलेल्या चालक, वाहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.घरची दिवाळी सोडून प्रवाशांच्या सेवेसाठी बीड, उस्मानाबाद आदी ठिकाणाहून आमचे चालक मुक्कामाला आले आहेत. विश्रामगृह बंद केल्याने त्यांची राहण्याची, स्वच्छतागृहाची सोय करणार कोठे, विश्रामगृह बंद केल्यामुळे पाणीदेखील बंद झाले आहे, असे बारामती येथील एसटी कामगारांनी सांगितले.एसटी कामगारांची दिवाळी कडू केलीएसटी कर्मचारी आणि राज्य केंद्र शासनाचे इतर कर्मचारी यांच्या वेतनामध्ये फरक आहे. या आर्थिक तफावतीमुळे एसटी कामगार त्यांच्या मुलांना आवश्यक सोयी-सुविधा करू शकत नाही. त्यामुळे हे कर्मचारी कायम आर्थिक तणावात काम करतात. राज्य शासनामुळे एसटी कर्मचाºयांची दिवाळी कडू झाली, अशी टीका बारामती - मोरगाव मार्गावरील नियमित प्रवास करणारे एसटी प्रवासी श्रीनिवास मोरे यांनी केले....खासगी चालकाला २२ हजार पगारखासगी चालकाला २२ हजार पगार मिळतो. मात्र, आमचा एसटीचालक ८ हजारांत काम करतो. ही तफावत चुकीची आहे. राज्य शासनाचा खासगीकरणाकडे ओढा असल्याचे दिसते, असे एसटी संघटनेचे प्रतिनिधी शाहीद सय्यद यांनी सांगितले.नारायणगाव : विविध प्रलंबित मागण्यासांठी सुरू असलेला एसटी कामगारांचा बंद दुसºया दिवशीही कायम होता. दरम्यान, दिवाळी उत्सव सुरू असल्याने दिवाळी साजरी व्हावी, म्हणून महिला कामगारांनी एसटी कामगारांसाठी बस स्थानकातच स्वयंपाक करून दिवाळी साजरी केली.नारायणगाव एसटी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक आदी ४ संघटना व कृती समिती यांच्या वतीने, तर बस आगारातील कर्मचाºयांसाठी असलेल्या विश्रामगृहाला काल रात्री कुलूप लावल्याने कर्मचाºयांना खासगी लॉजिंगला मुक्काम करावा लागला. एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त्त केली.सलग दुसºया दिवशी संंपूर्ण बस स्थानक पूर्णपणे रिकामे होते. नारायणगाव आगारातील चालक, वाहक, वर्कशॉप व इतर कर्मचारी यांनी बंदमध्ये सहभागी होऊन बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. कालपासून सुरू असलेल्या संपास कर्मचाºयांंना बस स्थानक परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला होता.सकाळी १० वा बसस्थानकात महिला कर्मचाºयांनी पिठलं व भात तयार करून दिवाळी साजरी केली. या आंदोलनात नारायणगाव आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर इनामदार व सचिव गणेश गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सलग दुसºया दिवशी बंदमुळे एसटी महामंडळाचे सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने नुकसान झाले.बंदमुळे घरी जाणा-या कामगारांची दैनाकुरकुंभ : औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाºया कामगारवर्गाला आज सुरू झालेल्या एसटीच्या राज्यव्यापी संपाचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तर प्रवाशांनी मिळेल, त्या वाहनाचा आधार घेत घर गाठण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र कुरकुंभ येथे दिसून आले.कुरकुंभ येथे हजारो कामगार काम करतात. दिवाळीच्या सुट्या लागल्याने प्रवासात सोबत असणारे सामान घेत खासगी ट्रकमध्ये बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कामगारांची पुरती तारांबळ उडाल्याचे दिसून आले.महामार्गावर प्रवासाकरिता असंख्य वाहने उपलब्ध होतात. मात्र ग्रामीण भागात जिथे फक्त एसटीच पोहोचते त्यांचे काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. संपामुळे सारे बेहाल झाले आहेत.सामान्य माणूसच वेठीसकुठेही, काहीही, आपत्ती आली तरी सामान्य माणूसच वेठीस धरला जातो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीचा सामना करणे एवढेच त्याच्या हातात असते.वर्षभर काम करून दोन दिवस सुखाने दिवाळीच्या सणालादेखील जाता येत नाही. त्यामुळे कुठेही काहीही झाले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा सामान्य व चाकरमान्यांना सोसावा लागतो, याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.एवढ्याशा पगारात संसार होणार कसा?गेल्या नऊ वर्षांपासून मी एसटीमध्ये महिला वाहक म्हणून काम करत आहे. मात्र, माझा पगार ११ हजारांच्या पुढे अद्याप गेलेला नाही. सकाळी ६ ला ड्युटीवर येण्यासाठी पहाटे चार वाजताच दिवस सुरू होतो. दुपारी घरी गेल्यावर घरकामे करण्यात वेळ जातो. त्यातून अनेकदा आजारपण वाट्याला येते. सर्व कपात होऊन आमच्या हातात ५ हजार रुपये येतात. त्यातून घरभाडे आदी खर्च पुरत नाही. त्यामुळे एवढ्याशा पगारात आमचा संसार होणार कसा, असा सवाल महिला वाहक गोदावरी चाटे यांनी केला.नोकरदार झाला कमालीचा हैराणभोर : ऐनदिवाळीत एसटी संघटनेच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप केल्यामुळे मंगळवारपासून एकही एसटी सुरूनसल्याने सुमारे ४ हजार शालेय विद्यार्थ्यांचे, एक हजार पासधारक नोकरीवाल्यांचे आणि हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात मोठे हाल सुरू आहेत. यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.एसटी कर्मचाºयांच्या संपात भोर आगारातील एकूण ३०७ कर्मचारी संपावर गेल्यामुळे भोर-पुणे १५० फेºया व एकूण ५०० फेºया रद्द झाल्या आहेत. दररोजचा सुमारे २० हजार, दोन दिवसांत ४० हजार किलोमीटरचा प्रवास थांबला असून दररोजचे ७ लाखांप्रमाणे १४ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. संपामुळे ग्रामीण भागातील एसटी फेºया बंद झाल्याने शाळेतील मुलांचे आणि भोर पुणे नोकरीसाठी जाणाºया नोकरवर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. दिवाळीनिमित्त भोरला बाजाराला आलेल्या नागरिकांचे काल हाल झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भोरला फिरकलेच नसल्याने भोरच्या बाजारपेठेवर ५० टक्के परिणाम झाला आहे. ऐनदिवाळीत सुरू झालेल्या संपाचा फटका लोकांना बसला आहे.इतर ठिकाणी खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. मात्र भोर आगारात एकही गाडी बाहेर नसून खासगी गाड्यांचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ४ हजार पासधारक शालेय विद्यार्थी, एक ते दोन हजार पासधारक नोकरवर्ग व हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.खासगी वाहनांकडून भरमसाट दरदौंड : एसटी आगारातील कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. परंतु, खासगी वाहतूक मात्र तेजीत आली आहे. सर्वसामान्य प्रवासी मेटकुटीला आले आहेत.प्रवाशांना खासगी सेवा घेताना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. खासगी वाहतूकदार गाड्यांमध्ये प्रवाशांना कोंबून बसवत आहेत. एसटी कर्मचाºयांनी एसटी स्टँड परिसरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एसटी आगारात विश्रामगृह आणि स्वच्छतागृहाला वरिष्ठ अधिकाºयांनी टाळे लावल्यामुळे कर्मचाºयांना आगारात बंदी करण्यात आलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमचा संप मागे घेतला जाणार नाही, असे एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित येडे यांनी सांगितले.जे संपात सहभागी झाले आहेत, अशा एसटी कर्मचाºयांना एसटी डेपोच्या आगारात प्रवेश देऊ नये, अशा वरिष्ठांच्या सूचना आल्यामुळे विश्रामगृहाला टाळे लावण्यात आले आहे.- प्रकाश शेलारप्रभारी आगारप्रमुख, दौंडशासन जाणीवपूर्वक संप चिघळवतंयबारामती : एसटीचा संप राज्य शासन जाणीवपूर्वक चिघळवत आहे. भाजपाचे सरकार केवळ शेतकरीविरोधी नसून कष्टकºयांच्याही विरोधातील आहे, अशी टीका उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी आज येथे केली.बारामती येथील एसटीच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या दुसºया दिवशी बुधवारी (दि. १८) उपनगराध्यक्ष पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी कामगारांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. तसेच चर्चा केली.या वेळी पाटील यांनी एसटी कामगारांच्या राज्य शासनाच्या धोरणांवर टीका केली. या वेळी पाटील म्हणाले, की एसटीच्या संपाकडे राज्य शासन गांभीर्याने लक्ष दिले नाही. गेले दीड वर्ष राज्य शासनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आताही २५ वर्षे सातवा वेतन आयोग मिळणार नाही, अशी बेताल वक्तव्ये खुद्द मंत्रीच करतात, हे निषेधार्ह आहे.शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर म्हणाले, की हे सरकार निर्दयी आहे. सरकारविरोधात जिथे संघर्ष करायचा तिथे करू. मात्र कष्टक-यांच्या भाकरीचा प्रश्न आहे. एसटी कामगारांना १०-१५ वर्षे काम

टॅग्स :ST Strikeएसटी संपPuneपुणे