कोविड आजाराकडे न घाबरता सकारात्मकतेतून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:50+5:302021-05-18T04:09:50+5:30

:स्वामी चिंचोली येथील हवा मल्लिनाथ मठात असलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रसिद्ध व्याख्याते शशांक मोहिते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ...

Look positively without fear of covid disease | कोविड आजाराकडे न घाबरता सकारात्मकतेतून पाहा

कोविड आजाराकडे न घाबरता सकारात्मकतेतून पाहा

Next

:स्वामी चिंचोली येथील हवा मल्लिनाथ मठात असलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रसिद्ध व्याख्याते शशांक मोहिते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील हवा मल्लिनाथ मठात दौंड तालुक्यातील सर्वांत मोठे कोविड सेंटर आहे. येथे उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी, तसेच या आजाराकडे त्यांनी न घाबरता सकारात्मकतेतून पाहायला हवे यासाठी निर्धार सकारात्मकतेचा या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते शशांक मोहिते यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर हे उपस्थित होते.

यावेळी मोहिते यांनी Positive ह्या शब्दाचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांच्या मुखातून जसे शब्द बाहेर पडत होते तसे रुग्णाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होत होते. रुग्णांसहित सर्वांना पोट धरून हसायला लावले. तसेच, उपस्थित सर्वांचेच मनोबल नक्कीच वाढण्यासाठी मदत झाली. जागतिक परिचारिकादिनाचे औचित्य साधून येथील परिचारिकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्वामी चिंचोली गावचे उपसरपंच प्रकाश होले, मच्छिंद्र मदने, धनाजी मत्रे, राम शेंद्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदित्य मोहिते, राजेश मोहिते, ओंकार वाघ त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व कर्मचारी, स्टाफ, पदाधिकारी उपस्थित होते.

स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील हवा मल्लिनाथ मठात असलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रसिद्ध व्याख्याते शशांक मोहिते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील हवा मल्लिनाथ मठात असलेल्या कोविड सेंटर मध्ये जागतिक परिचारिकादिनाचे औचित्य साधून येथील परिचारिकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Look positively without fear of covid disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.