१७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ४० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सध्या प्रशांत काळभोर गटाची सत्ता असल्याने हा गट सत्ता राखण्यासाठी तर माधव काळभोर यांचा गट सत्ता परिवर्तण करण्यासाठी साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर करण्याची शक्यता आहे. यामुळे संपुर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लोणी काळभोरच्या निवडणुकीकडे लागले आहे.
पुणे शहरालगत असलेली व आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी लोणी काळभोरची ग्रामपंचायत संपुर्ण जिल्ह्यात गावकी - भावकीच्या राजकारणासाठी प्रसिध्द आहे. गावची मतदारसंख्या २५ हजारावर पोहोचली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांची सत्ता आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीत उभे ठाकलेले माधव काळभोर व प्रशांत काळभोर हे दोन्ही मात्तबर नेते ग्रामपंचायतीच्या मागिल पंचवार्षिक निवडणुक एकत्र होते. मात्र, पाच वर्षाच्या काळात सत्तेसाठी दोघात राजकीय वितुष्ठ आले आहे.
माधव काळभोर यांच्या समवेत माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, जिल्हा परीषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहे्ब काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर शिवदास काळभोर या मातब्बर नेत्यांनी सत्तेचे परीवर्तण करण्यासाठी कंबर कसली आहे. माधव काळभोर व विलास काळभोर हे दोघेही राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. दोघांनीही खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातुन विकास निधी मिळवण्यासाठी मतदारांच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता मागितली आहे. तर प्रशांत काळभोर यांच्या समवेत बाजार समितीचे माजी संचालक दिलीप काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य संजय गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य मल्हारी कोळपे, लोणी काळभोरचे माजी सरपंच शऱद काळभोर, वंदना काळभोर, अश्विनी गायकवाड, यशवंतचे माजी संचालक बापु बोरकर, विठ्ठल काळभोर, इंद्रभुज काळभोर आदी नेत्यांनी ग्रामपंचायतीची सत्ता पुढील पाच वर्षासाठी आपल्याच गटाच्या हातात ठेवण्यासाठी प्रय़त्न चालवले आहे.
प्रभागनिहाय दोन्ही पॅनेलचे उमेदवार: प्रभाग क्रमांक-१
-(परिवर्तन पॅनल) - राजाराम काळभोर, सविता लांडगे व प्रियांका काळभोर (अष्टविनायक पॅनल) - विशाल उर्फ राज प्रताप काळभोर, गायत्री दुंडे व शुभांगी क्षिरसागर. (अपक्ष शिवाजी विष्णू काळभोर - मोगले) प्रभाग क्रमांक-२- (परिवर्तन पॅनल) - मनोज गायकवाड, मिनाक्षी राखपसरे व ललिता काळभोर (अष्टविनायक पॅनल) - सुनीता काळभोर, सुनिल गायकवाड व सविता जगताप
(अपक्ष) अनिता गवळी व साधना काळभोर. प्रभाग क्रमांक -३(परिवर्तन पॅनल) - आण्णासो काळभोर व माधुरी काळभोर (अष्टविनायक पॅनेल) - राहुल काळभोर व
स्वाती हाडके (अपक्ष) माजी ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे. प्रभाग क्रमांक-४ (परिवर्तन पॅनल) योगेश काळभोर, गणेश कांबळे व भारती काळभोर (अष्टविनायक पॅनल) कमलेश काळभोर, नलिनी काळभोर व संजय भालेराव.
प्रभाग क्रमांक ५ - (परिवर्तन पॅनल) भारत काळभोर, ज्योती काळभोर व रत्नाबाई वाळके (अष्टविनायक पॅनल) दिग्वीजय उर्फ भैय्या काळभोर, संगीता काळभोर व
रमेश यशवंत भोसले. प्रभाग क्रमांक-६- (परिवर्तन पॅनल) नागेश काळभोर, मोनिका केसकर व संगीता काळभोर. (अष्टविनायक पॅनल) बाळासाहेब काळभोर, माधुरी काळभोर व बकुळा केसकर (अपक्ष) शेखर मधुकर काळभोर व मंदाकिनी शिवाजी गायकवाड.