शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विधानसभेच्या समीकरणावर लोकसभेचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:48 IST

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी कॉँग्रेसची मदत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: इंदापूर, पुरंदर आणि भोर-वेल्हे-मुळशी या मतदारसंघात कॉँग्रेसची लक्षणीय ताकद आहे.

पुणे : विधानसभेच्या चार महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीतील समीकरणेच लोकसभेचे गणित ठरविणार असल्याचे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातून दिसून येत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली; शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युतीही झाली. दोघांसाठी जमेची बाजू ठरली तरी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत चारही पक्ष वेगळे लढल्याने वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे उमेदवारांसाठी सुरुवातीचे काही दिवस रुसवे-फुगवे काढण्यातच घालविण्याची वेळ आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी कॉँग्रेसची मदत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: इंदापूर, पुरंदर आणि भोर-वेल्हे-मुळशी या मतदारसंघात कॉँग्रेसची लक्षणीय ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत काय भूमिका घेतली जाणार, यावर प्रचारात उतरायचे की नाही, याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. इंदापूर मतदारसंघात गेल्या वेळी राष्टÑवादीचे दत्तात्रय भरणे निवडून आले होते. त्यांनी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. लोकसभेच्या निमित्ताने हा जुना हिशेब चुकता करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी पाटील यांची भेट घेतली. मात्र, तरीही कार्यकर्ते मानायल तयार नव्हते. स्थानिक पातळीवरील राजकारणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्व आहे. त्यांच्याकडून आश्वासन हवे होते. त्यामुळे गेल्या २५ वर्षांतील राजकीय वैर विसरून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. त्यांना इंदापूरसाठी जागा सोडण्याचे आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, यातून सारेच आलबेल घडेल, असे नाही. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची समजूत कशी घालणार, हा आता राष्टÑवादीपुढे प्रश्न आहे. भरणे आणि त्यांच्याबरोबरचा गट १९९९पासून पाटील यांच्याविरोधात लढत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी इंदापुरात अनेक प्रयोग करण्यात आले. दशरथ माने यांच्यासारखे पाटील यांचे एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते फोडण्यात आले. मात्र, या सगळ्यामध्ये यश २०१४मध्ये मिळाले. आता पुन्हा पाटील यांचे नेतृत्व ही सगळी मंडळी मानणार आहेत का? की पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे राष्टÑवादीच्या कुमकीवर एखादा नेता पुन्हा त्यांच्याविरोधात बंडखोरी करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे एकनिष्ठ असले तरी गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. अजित पवार आणि गिरीश बापट हे पुण्यातील बहुचर्चित ‘पुणे पॅटर्न’चे शिल्पकार मानले जातात. हा पॅटर्न इंदापूरलाही वापरला जाणार नाही कशावरून? कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनाही पुरंदरसाठी शब्द दिल्याची चर्चा आहे; पण येथे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून विधानसभेसाठी तब्बल ३० जण रांगेत आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय शिवतारेदेखील पूर्वी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये होते. परंतु, या सगळ्या इच्छुकांशी लढण्यातच दमछाक व्हायला नको, यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडूनही आले. याशिवाय लोकसभेसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर महाराष्टÑ नवनिर्माण सेना जाणार आहे. या पक्षाचे बाबाराजे जाधवरावदेखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी जगताप यांना शब्द मिळाल्यामुळे या सगळ्या इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. त्यातील काही महत्त्वाकांक्षी हा निर्णय मान्य करतील, असे नाही.

भोर-वेल्हे-मुळशी मतदारसंघात राष्टÑवादीचे कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत जोशात येतात. संग्राम थोपटे यांच्याविरोधात दंड थोपटतात. आता त्यांना गप्प बसावे लागणार असले, तरी मताधिक्याच्या श्रेयाची भीती राहणारच आहे. दौंडमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कुल हेच आमदार आहेत. गेल्या वेळीचे २५ हजारांचे मताधिक्य टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. यापेक्षा राष्टÑवादीचे आमदारकीचे दावेदार रमेश थोरात यांचीहीपरीक्षाच आहे.च्खडकवासला मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची दुसरी टर्म आहे. तरी भाजपमध्येही अनेक इच्छुक आहेत. कोणत्या भागातून जास्त मते मिळतात; त्याप्रमाणे उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक