शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
6
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
7
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
8
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
9
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
10
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
11
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
12
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
13
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
14
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
15
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
16
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
17
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
18
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
19
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

लोकमत वुमेन समीट २०१९ - दोन संघर्षशालिनींचा गौरव.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:56 IST

सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी.

ठळक मुद्दे‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण

पुणे : आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आणि बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना सक्षम करणाऱ्या ठमाताई पवार यांना  ‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ तर ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांना  ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.     ’लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के.एच संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब मुजुमदार आणि लेक्सिकन स्कूलच्या संचालिका डॉ. मोनिशा शर्मा उपस्थितीत या दोन संघर्षशालिनींचा गौरव करण्यात आला.

    सत्काराला उत्तर देताना ठमाताई पवार म्हणाल्या,मी स्वत: शिकलेले नाही. वनवासी कल्याण आश्रमात भाकरी थापता थापता पीठात अक्षर काढायला शिकले. लग्नानंतर दोन मुले झाल्यावर लिहायला शिकले. आज आदिवासी पाड्यातील स्थिती पाहिली तर महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. घरातली कर्ती बाईच अशी असेल तर मुलांवर काय संस्कार होणार? तिच्या आरोग्यावरही परिणाम होणारच यासाठी गावातील लोकांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. गावात भजनी मंडळे सुरू केली. दिंड्या काढल्या आणि ही व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जो समाज भरकटलेला आहे. तो मुख्य प्रवाहात यावा अशी इच्छा आहे, त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, शिक्षणानेच ही गोष्ट साध्य होणार आहे.    सुमित्रा भावे यांचे मनोगत यावेळी वाचून दाखविण्यात आले. गेली जवळजवळ पस्तीस वर्षे मी चित्रपट बनवत असले तरी माझे चित्रपट ज्यांना व्यावसायिक किंवा करमणूकप्रधान म्हटले जातात त्या पठडीतील नसल्यामुळे त्यांना ग्लँमर नाही. पण तरीही लोकमत वृत्त्तसंस्थेनं माझं काम बघितलं आणि त्याचं कौतुक केलं. ही गोष्ट मला नुसती माझ्या वैयक्तिक आनंदाची वाटली नाही तर प्रगल्भ सामाजिक जाणिवेची ती खूण आहे अशी भावना त्या मनोगतातून त्यांनी मांडली. सध्याच्या काळात  ‘पेड जर्नँलिझम’ हा विषय खूप चर्चेत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात स्वच्छ, सकस, संवेदनशील असं काम केलं तर पत्रकार तुमचा आदर करून तुमच्या कामाला समाजासमोर आणण्यास मदत करतात हे पुन्हा एकदा अनुभवून त्याचा अभिमान वाटला असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
    या समिटची संकल्पना  ‘लिव्ह टू लीड’ अशी आहे. पण सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी  ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी. स्त्रीने नेतृत्वात पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत असताना इथे स्त्री-पुरूष यांच्यातला शारीरिक भेद अभिप्रेत नाही. कारणं तसं म्हटलं तर ते विधान एकतर्फी आणि पुरूषांवर अन्यायकारक होईल. इथं शारीरिक भेद अभिप्रेत नसून गुणवैशिष्ट्य, अभिप्रेत आहे. मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं म्हणजेच स्त्रीत्व! आणि निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण म्हणता येतील. या दोन्ही गुणांची बेरीज झाल्याखेरीज समाजातील विषमता जाऊन निर्भेळ न्यायाचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुतेचे म्हणजे मैत्रीचे वातावरण तयार होणार नाही. ही बेरीज, समतोल होण्यासाठी गुणांचे मूल्य बदलत राहावे लागेल. काळाच्या गरजेनुसार गुणांचे मूल्य बदलेल असेही विचार त्यांनी मनोगतातून समोर आणले. 

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटLokmat Eventलोकमत इव्हेंटSumitra Bhaveसुमित्रा भावेVijay Dardaविजय दर्डाWomenमहिला