शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 22:18 IST

‘लोकमत मराठी भाषा संमेलन’ कोथरुडमध्ये; महाराष्ट्राच्या मानबिंदूसोबत साजरा करू मराठी राजभाषा दिन 

पुणे : मराठी राजभाषा दिनानिमित्त रविवारी महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या वतीने लोकमत मराठी भाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतच्या या महामैफलीत काव्य, नाटक, परिसंवादातून मराठीचा जागर होणार आहे.  कोथरुडच्या बालशिक्षण सभागृहात येत्या रविवारी ही मराठमोळी मैफल  रंगणार आहे. प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले या संमेलनाचे उद्घाटक असून, प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ अध्यक्ष असणार आहेत. ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे आहेत.दुपारी तीन वाजता प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता शिवराज वायचळ यांचे 'लव्ह यू' हे नाटक या संमेलनाचे आकर्षण आहे. मूळचे हे जर्मन नाटक 'मॅक्समुल्लर भवन'ने खास मराठीत आणले आहे.दुपारी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. मराठी संवर्धनासाठी काम करणाऱ्या मराठीप्रेमींचा यामध्ये सन्मान केला जाणार आहे.सायंकाळी साडेपाच वाजता काव्यऋतू अर्थात काव्य मैफलीत कवितांची बरसात होणार आहे. ज्येष्ठांबरोबरच नव्या दमाचे तरुण कवीही यामध्ये सहभागी होणार आहेत. 'मराठी फुलवणारी तरुणाई' या परिसंवादात नव्या युगाच्या मराठीचा जागर तरुण करणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता हा परिसंवाद रंगणार आहे.रात्री आठ वाजता ‘सोबतीचा करार‘ या सांगीतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे. मराठी गझलचा बेभान थरार अनुभवता येणार आहे. प्रसिध्द कवी वैभव जोशी यांचे काव्यलेखन आणि सादरीकरण आहे. दत्तप्रसाद रानडे यांचे गायन आहे.

प्रथमच होणाऱ्या लोकमत मराठी भाषा संमेलनात सहभागी होण्याचे ‘लाभले आम्हास भाग्य’ अशीच पुणेकरांची भावना असेल. हा जागर मराठीची कीर्ती त्रिखंडात वृद्धिंगत करेल, यामध्ये शंका नाही. कविता, नाटक, गझलांच्या सांगीतिक मेजवानीबरोबरच मराठीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या पुणेकरांना गौरविले जाणे अभिनव आहे. लोकमत मराठी भाषा संमेलन ही पुण्याची आगळी-वेगळी ओळख बनेल.- उषा काकडे, अध्यक्षा, ग्रॅव्हिटास फाऊंडेशन