शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Impact : मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदल फसला; वाहतूक पुन्हा जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 14:32 IST

मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदलाचा बोजवारा उडाला होता.

हडपसर : मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदलाचा बोजवारा उडाला. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास होत असल्याचे झाल्याचे वृत्त 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत हडपसर वाहतूक विभागाने पुन्हा वाहतूक जैसे थी केली. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

मुंढवा मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलावरून बंद केली होती. सर्व्हिस रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहने बसत नव्हती. तसेच वाहनांचा फ्लो जास्त असल्याने वाहतूक कोंडी होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे नागरिक कमालीचे त्रासले होते. तसेच मगरपट्टा चौकातून चंदननगरकडे जाणाऱ्या वाहनांना वैदूवाडी चौकातून टर्न घेण्यास सांगितले जात होते. मात्र, अनेक वाहनांनी चौकाच्या पुढे जाऊन छोट्या जागेतून वाहने वळविण्याचा प्रयत्न केल्याने वाहनांची खच्चून गर्दी झाली. वाहतूक सुरळीत होण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या गेल्या. त्यातच माजी उपमहापौर निलेश मगर यांनीही तातडीने दखल घेत त्याविषयी आवाज उठवून नागरिकांच्या सोयीचे बदल करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

मगर म्हणाले की, मगरपट्टा चौकात महापालिकेचे रुग्णालय आहे, तसेच अनेक खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे हा चौक यू- टर्नसाठी बंद करता येणार नाही. यू टर्न बंद केला तर रुग्णवाहिकांमध्ये रुग्णांची तडफड होईल आणि त्यांचे खापर आम्हा लोकप्रतिनिधींच्या माथी मारले जाईल. त्यामुळे वाहतूक सुरळीत कऱण्यासाठीचे बदल करावेत. मात्र, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दादा चुडाप्पा म्हणाले की, पूर्वी वाहतूक होती, त्याप्रमाणेच सुरू राहील. तसेच पुढील नियोजनासाठीसाठी काही नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HadapsarहडपसरTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसhospitalहॉस्पिटल