शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : आता ‘होम आयसोलेशन’ झालेल्या रूग्णांच्या हातावर शिक्का व घराच्या दारावर स्टिकर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 12:54 IST

पुणे महापालिकेने कोरोनाबाधित रूग्णांच्या हातावर ‘होम आयसोलेशन’चा शिक्का मारून व त्यांच्या घराच्या दारावर स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला..

ठळक मुद्देहोम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधितांकडून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास

पुणे : ‘होम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांचा घराबाहेरील होणारा सर्रास वावर रोखण्यासाठी, पुणे महापालिकेने आता पुन्हा अशा कोरोनाबाधित रूग्णांना हातावर ‘होम आयसोलेशन’चा शिक्का मारून व त्याच्या घराच्या दारावर ‘होम आयसोलेशन’च्या आदेशाचे स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.     कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत पण पॉझिटिव्ह आहेत, असे शेकडो कोरोनाबाधित रूग्ण तपासणीअंती ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारून घरी राहतात. पण एक दोन दिवस घरात राहिल्यावर हे रूग्ण सर्रासपणे घराबाहेर पडून गर्दीत मिसळत असल्याचे आढळून आले.तसेच अशा होम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधितांकडून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले.या पार्श्वभूमीवर अशा रूग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा महापालिकेने त्यांची ओळख पटावी म्हणून, ‘होम आयसोलेशन’ साठी घरी पाठवितानाच त्यांच्या हातावर ओसोलेशनचा कालावधी नमूद असलेला व महिनाभर तरी पुसली जाणार नाही अशा शाईचा वापर करून शिक्का मारण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच वॉर्ड ऑफिस स्तरावरून संबंधित रूग्णाच्या घराच्या दारावर तसेच दर्शनी भागावर ‘होम आयसोलेशन’चे स्टिकर्स लावले जाणार आहे. यामध्ये आयसोलेशन झालेल्या व्यक्तीचे नाव, आयसोलेशनचा कालावधी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाºया यंत्रणेचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात येणार आहे.     पुणे महापालिका हद्दीत साधारणत: सात हजार कोरोनाबाधित रूग्णांनी ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारला आहे. अशा सर्व रूग्णांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांचा सामाजिक जीवनात १४ दिवस वावर होणार नाही याकरिता कसे निर्बंध घालता येतील याबाबत महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी नियोजन करून, त्याबाबतचे आदेश व नियमावली प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांना पाठविण्यात येणार आहे.---------------------‘होम आयसोलेशन’ झालेली व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास होणार पोलीस कारवाई     महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटर मध्ये न राहता ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून १४ दिवस घरात राहणार असे हमीपत्र देऊन घरीच राहणारी कोरोनाबाधित व्यक्ती यापुढे घराबाहेर फिरताना दिसल्यास संबंधितांवर आता थेट पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत महापालिका ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून घरी परतलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचे नावे, पत्ता व आयसोलेशन कालावधी याचा तपशील पोलीस यंत्रणेला सूपूर्त करणार आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या-त्या भागातील होम आयसोलेशन झालेल्या रूग्णांची माहिती देऊन त्यांच्यावर घराबाहेर पडल्यास कारवाई केली जाणार आहे.ही कारवाई काय असेल याचा तपशील शुक्रवारी होणाºया बैठकीत निश्चित होणार आहे. ------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याHomeघर