शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:04 IST

काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे. 

ठळक मुद्देवितरणाआधीच ठरतेय किंमतपुणे लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या ३१ प्रत्येक उमेदवाराला त्याचे प्रतिनिधी मतमोजणी सभागृहात आणता येतातप्रत्येक टेबलला एक प्रतिनिधी याप्रमाणे उमेदवाराला पास पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी १०२ टेबल असणार

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस जवळ येऊ लागला तसा त्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मिळणाºया पासचा बाजार तेजीत येऊ लागला आहे. प्रशासनाने अद्याप पास वितरीत केलेले नाही तरीही त्याची किंमत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आधीच निश्चित केली जात आहे. एका पासची किंमत असे न करता एकदम ठोक रक्कम ठरवण्यात येत असून त्यात मागेपुढे करण्याचे काम सध्या सुरू आहे.पुणे लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या ३१ आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराला त्याचे प्रतिनिधी मतमोजणी सभागृहात आणता येतात. प्रत्येक टेबलला एक प्रतिनिधी याप्रमाणे उमेदवाराला पास वितरीत करण्यात येतात. पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी १०२ टेबल असणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय त्याची रचना करण्यात येते. त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला १०२ पास मिळतील. 

उमेदवारांची संख्या ३१ असली तरी त्यातील प्रमुख उमेदवार दोनच आहेत. त्यांना जास्त मतमोजणी प्रतिनिधी आणण्याची गरज असते. प्रमुख उमेदवार वगळता अन्य उमेदवारांना त्यातही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांना मतमोजणी प्रतिनिधींची विशेष गरज नसते. अपक्ष असले तरीही त्यांना प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासारखेच सर्व अधिकार असतात, त्यामुळे त्यांनाही पास मिळतातच. या त्यांच्यासाठी जास्त असलेल्या पासचा काही जणांकडून बाजार केला जात असल्याचे दिसते आहे. फुकट मिळणाऱ्या या पासवर पैसे कमवण्याचा उद्योग होत आहे.प्रशासनाकडून आला उमेदवार की दिले त्याच्याजवळ पास असे केले जात नाही. त्यासाठी उमेदवाराला जेवढे पास तेवढ्या कार्यकर्त्यांची नावे त्यांच्या प्रत्येकी दोन छायाचित्रांसह प्रशासनाला द्यावी लागतात. त्यांची छाननी केली जाते. त्यानंतरच पास वितरीत केले जातात. प्रत्येक पासवर नाव, संबधित प्रतिनिधीचे छायाचित्र असते. त्यावरही आता पासची विक्री करणाऱ्यांनी मात केली आहे. ज्यांच्याबरोबर व्यवहार केला जात आहे, त्यांच्याकडून त्यांच्याच कार्यकर्त्यांची नावे व छायाचित्र प्रशासनाकडे स्वत:चे कार्यकर्ते म्हणून दिले जात आहेत. त्यामुळे मतमोजणी सभागृहात या कार्यकर्त्यांना त्या उमदेवाराची मतमोजणी प्रतिनिधी म्हणून विनासायास प्रवेश मिळेल व एकदा आत गेल्यानंतर ते कार्यकर्ते आपल्या मुळ उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून मतमोजणी टेबलजवळ बसू शकतील. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. त्यांना सर्वांनाच मतमोजणीसाठी आत यायचे असते. त्याशिवाय उमेदवारालाही त्याच्या काही अनुभवी कार्यकर्त्यांचे मतमोजणी सुरू असताना तिथे उपस्थित असणे आवश्यक वाटते. त्या सर्वांना आत घ्यायचे तर तेवढट्या मोठ्या संख्येने पास मिळत नाही.अपक्ष उमेदवारांकडून पास घेऊन कार्यकर्त्यांच्या मतमोजणी सभागृहातील प्रवेशाची व्यवस्था करणे त्यांना सोपे होते. त्यामुळेच प्रशासनाने पास वितरीत करण्याआधीच काहीजणांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्क साधतआहेत. काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे. ....अशी होते मतमोजणीसभागृहात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होते. टेबलच्या एका बाजूला मतदानयंत्र व कर्मचारी तर दुसऱ्या बाजूला उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी असतात. मध्ये लोखंडी जाळी असते. राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष, मग अपक्ष या क्रमाने मतमोजणी प्रतिनिधींना बसवले जाते. प्रत्येक यंत्र आले की त्याचा क्रमांक दाखवून सील तोडले जाते. त्यानंतर प्रत्येक मताची मोजणी प्रतिनिधींना दाखवत केली जाते. यंत्र दाखवेल त्याप्रमाणे मतदान कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधी मतांची कागदावर नोंद करतात. प्रत्येक फेरीची मतमोजणी याप्रमाणे होते.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण