शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक: कार्यकर्त्यांसाठी शाकाहरी जेवण १६०, तर चहा १०, कॉफी १५ रुपयांची

By प्रकाश गायकर | Updated: March 23, 2024 18:05 IST

शाकाहारी जेवणासाठी आता ११२ ऐवजी १६० रुपये तर, सामिष थाळीसाठी २५० रुपये दर निश्चित केले आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७५ लाखांवरून ९५ लाख केली आहे....

पिंपरी : लोकसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाने विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. आयोगाची या खर्चावर नजर राहणार असून, त्याचा तपशील निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे दर १२ ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामध्ये शाकाहारी जेवणासाठी आता ११२ ऐवजी १६० रुपये तर, सामिष थाळीसाठी २५० रुपये दर निश्चित केले आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७५ लाखांवरून ९५ लाख केली आहे.

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना मतदारसंघात प्रचारासाठी फिरावे लागते. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरावी लागते. त्यांच्या नाश्तापाण्यापासून ते जेवणापर्यंतचा सर्व खर्च उमेदवाराला करावा लागतो. तर मतदारराजालाही खूष करण्यासाठी जेवणावळी घालाव्या लागतात. यासाठी निवडणूक काळात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. कार्यकर्ते सांभाळण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंत उमेदवारांना हात सैल सोडावा लागतो. यात निवडणूक केवळ पैशांच्या आधारावर लढविली जाऊ नये, यासाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा निश्चित करून दिली जाते. त्यामुळे उमेदवाराला प्रत्येक खर्च दररोज निवडणूक विभागाला विहित नमुन्यात सादर करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या बाबींवर किती खर्च करायचा, याचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून प्रत्येक दर निश्चित आहेत.

उमेदवाराला ९५ लाखांची मर्यादा

मागील निवडणुकीच्यावेळी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ७५ लाख रुपये होती. यंदा ती ९५ लाख केली आहे. अर्ज दाखल केल्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

..असे आहेत दर

शाकाहारी जेवण १६०

सामिष जेवण २५०

अल्पोपाहार पोहे २०

चहा (प्रतिकप) १०

कॉफी १५

शीतपेय २०

सभांचा खर्चही दाखवावा लागणार

प्रचारावेळी होणाऱ्या जाहीर सभांवेळी वापरण्यात येणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरसाठी ५ तासांसाठी १० हजार रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय साउंड सिस्टिम लहान प्रत्येकी दोन स्पीकर, भोंगे प्रतिनग २४०० रुपये, तर मोठ्या साउंड सिस्टिमसाठी ३५०० रुपये दर निश्चित केला आहे. ट्यूबलाइट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये, फॅन लहान ७५ रुपये, कूलर १५० रुपये, डिजिटल टीव्ही व एलएडी स्क्रिन ६० रुपये, ड्रोन कॅमेरा आदींचेही दर निश्चित केले आहेत.

लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके

यंत्रणेने नोंदविलेला खर्च या दोन्हीची पडताळणी केली जाते. यात उमेदवाराने कमी खर्च दाखविल्यास त्यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाते. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात असणार आहे. प्रचार सभांचे व्हिडीओ शूटिंग केले जाईल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग