शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:23 IST

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह ३५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे संरक्षण मंत्रालयाकडून विस्तारीकरणासाठी १६ एकर जागा आता लोहगाव विमानतळावर वडापाव आणि भेळीवरही ताव मारता येणार

पुणे : लोहगावविमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणाच्या कामाच्या रखडलेल्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दुर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह ३५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे केली जाणार आहेत. मागील काही वर्षांपासून लोहगावविमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले होते. एकीकडे विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असताना विस्तारीकरणाअभावी प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देणे शक्य होत नव्हते. तसेच विमान उड्डाणांच्या संख्येवरही मर्यादा येत आहेत. २०१३ -१४ मध्ये ३५ लाख ९६ हजार ६८४ प्रवाशांचा आकडा २०१७ - १८ मध्ये ८१ लाख ६४ हजार ८४० वर पोहचला आहे. पुढील वर्षीपर्यंत ही संख्या एक कोटीचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तारीकरण करणे आवश्यक होते. आता जागेसह त्यामधील सर्व अडथळे दुर झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून विस्तारीकरणासाठी १६ एकर जागा मिळाली आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून ८०० कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दि. २० आॅक्टोबरला या कामाचे भुमीपुजन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. पुढील तीन ते साडे तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे आणि विमानतळ संचालक अजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या टप्प्यात ४२ हजार चौरस मिटर क्षेत्रफळाची इमारत उभारली जाईल. या इमारतीमध्ये पार्किंग, पाच सरकते जिने यांसह प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील. कार्गो आणि विमान कंपन्यांच्या विमानांसाठी १० एकर जागेचा वापर केला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले. विस्तारीकरणासाठी परिसरातील आणखी ३५ एकर जागा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच नवीन धावपट्टीसाठी २०० ते २५० एकर जागेची गरज असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.-----------------------वडापाव, भेळीवर मारा तावविमानतळावर गेले की तेथील चकचकीत रेस्टॉरंटमध्ये सहसा फास्टफूडच जास्त मिळते. त्याच्या किंमतीही जास्त असतात. त्यामुळे अनेकजण याठिकाणी जाणे टाळतात. पण आता लोहगाव विमानतळावर वडापाव आणि भेळीवरही ताव मारता येणार आहे. विमानतळावर लवकरच भेळ आणि वडापावचे आउटलेट सुरु केले जाणार असून टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. स्थानिक पदार्थ उपलब्ध करून देण्याची मागणी होती, असे अजय कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :LohgaonलोहगावAirportविमानतळGovernmentसरकार