शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:34 IST

कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे असं अजित पवारांनी सांगितले.

पुणे - राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे. पुण्यात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दोघांची ताकद आहे. त्याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढतील. ही मैत्रीपूर्ण लढत होईल असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महायुती तुटल्याचंही घोषणा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार असं आव्हान दिले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्‍यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी हे विधान केले म्हणजे ते चर्चेनंतरच केले असेल. आम्ही अनेकदा एकत्र बसलो, चर्चा करतो त्यानंतर फडणवीसांनी ते विधान केले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी विचारपूर्वक विधान केले असेल. २५ वर्ष मी महापालिका सांभाळली आहे. शहरांचा सर्वांगीण विकास कसा केला हे लोकांनी पाहिले आहे. परंतु दुर्दैवाने २०१७ साली माझ्याकडचे बरेच जण बाजूला गेले आणि तिथे भाजपाची सत्ता आली. आम्ही महाविकास आघाडी होतो, तिथे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार होते. त्यामुळे स्थानिक विचार करून पुढचे निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितले.

तसेच कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे. कुणाला निवडून आणायचे हे लोक ठरवतात. निवडून एखादा पक्ष आला तर ते ईव्हीएम चांगले आहे असं बोलतात. पराभूत झाल्यावर ईव्हीएमवर दोष द्यायचा हे बरोबर नाही. लोकसभेला आमच्या ३१ जागा पराभूत झाल्या अवघ्या १७ जागा आल्या तेव्हा विरोधकांना ईव्हीएम चांगले वाटले. आम्ही ईव्हीएमबाबत काही बोललो नाही. तो जनतेचा कौल होता. मात्र लाडकी बहीण, शेतकरी योजनेने ५ महिन्यात निकालात बदल झाला तर लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. काही काही ठिकाणी दुबार नावे, तिबार नावे यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला. ज्यावेळी मतदार यादीत हे घोळ होतात तेव्हा यादी बनवणाऱ्याने पारदर्शकता आणली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

पुण्यात भाजपाने ५ वर्ष चांगला विकास केला आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. मात्र पुण्याबाबत अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे समोरसमोर लढतील. पण ती लढत मैत्रीपूर्ण असेल. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Breaks! BJP and NCP to Fight Separately in Pune

Web Summary : The BJP-NCP alliance has collapsed in Pune ahead of municipal elections. While BJP aims for a repeat victory, Ajit Pawar vows to win Pune and Pimpri Chinchwad, committing his all to the cause. Both parties are set for a friendly contest.
टॅग्स :MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५