शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘स्वीकृत’च्या संधीसाठी नेत्यांकडे लॉबिंग

By admin | Updated: May 4, 2017 02:40 IST

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समितींचे सभापती निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवक कोण होणार याबाबत उत्सुकता

 पिंपरी : महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समितींचे सभापती निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवक कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्वीकृतसाठी ९ मेपर्यंत अर्ज दाखल करायचे असल्याने इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. इच्छुक नेत्यांचे उंबरे झिजवित आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात १२८ सभासद निवडून आले आहेत. त्यापैकी पक्षांना मिळालेल्या जागांनुसार ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड सभागृहामध्ये करता येणार आहे. महापालिकेमध्ये संख्याबळानुसार भाजपाला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ असे स्वीकृत नगरसेवक सभागृहामध्ये पाठविता येणार आहेत. मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, सारंग कामतेकर, अमोल थोरात, संघटन सरचिटणीस माउली थोरात, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने स्वीकृत सदस्यनिवडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, मच्छिंद्र तापकीर, आनंदा यादव यांच्या नावाची चर्चा आहे.उंबरे झिजविताहेतभारतीय जनता पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपल्या नावाची वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी भाजपातील स्थानिक नेते आमदार आणि खासदार यांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीतील इच्छुकांनीही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊनमागणी केली आहे.(प्रतिनिधी)प्र्राचार्य, वकिलांना संधी मिळणार?

महापालिकेला वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा महापालिकेला फायदा व्हावा या हेतूने स्वीकृत नगरसेवकपदाची तरतूद केली होती. मात्र, राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच स्वीकृत नगरसेवकपदाचा वापर आतापर्यंत केला आहे. नवीन नियमावली व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांपैकीच स्वीकृत सदस्य म्हणून निवड करता येणार आहे. मात्र, याबाबतचा निर्णयास सर्वोच्य न्यायलयात आव्हान दिले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विचार राजकीय पक्ष कितपत करणार असा प्रश्न आहे.