शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

आरटीओवर आरसी बुकचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 20:27 IST

वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत.

ठळक मुद्दे१५ हजार टपाल येतात परत : केवळ तीन वर्षांतील २५ हजार आरसी बुक जमादरवर्षी तीन ते सव्वातीन लाख आरसी कार्ड आरटीओ कार्यालयाकडून वितरीत तीन वर्षांत ४४ हजार ३७९ आरसीबुक टपाल विभागाने परत पाठविले.आरटीओकडे तीन वर्षांची तब्बल २५ हजार ४८३ कार्ड वा नोंदणी प्रमाणपत्र पडून

पुणे : तुम्ही वाहन विकत घेतले आणि नोंदणीची कागदपत्रे (आरसी बुक) तुम्हाला काही महिने झाल्यानंतरही मिळाली नसतील तर ती नक्कीच टपाल विभागाच्या कार्यालयीन प्रणालीत अथवा प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयात सापडतील. दरवर्षी सरासरी १५ हजार आरसीबुकचे टपाल आरटीओकडे पत्ता सापडत नसल्याच्या कारणाने माघारी जात आहेत. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयात परत गेलेली यातील निम्मी कागदपत्रेही वाहनचालक घेऊन जात नाहीत. परिणामी आरटीओ कार्यालयावर या आरसी प्रमाणपत्रांचा बोजा पडत आहे. वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत. दरवर्षी तीन ते सव्वातीन लाख आरसी कार्ड आरटीओ कार्यालयाकडून वितरीत केली जातात. त्यातील वर्षाला सरासरी १५ हजार कार्ड संबंधित वाहनमालकांपर्यंत पोहोचतच नाहीत. विशेष म्हणजे यातील निम्मे वाहनमालक देखील आपल्याला अशी कागदपत्रे मिळाली नसल्याबाबत आरटीओ कार्यालयाकडे चौकशी करताना दिसत नाहीत. आरटीओला २०१५-१६ ते २०१६-१७ या तीन वर्षांत ४४ हजार ३७९ आरसीबुक टपाल विभागाने परत पाठविले. यातील केवळ १८ हजार ८९४ वाहनचालकांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून आरसी प्रमाणपत्र घेऊन गेले आहेत. आरटीओकडे तीन वर्षांची तब्बल २५ हजार ४८३ कार्ड वा नोंदणी प्रमाणपत्र पडून आहेत. त्यापुर्वीची देखील हजारो कागदपत्रे पडून असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आरसी बुक हा मालकीचा पुरावा असतो. वाहन दुसऱ्याला विकायचे असल्यास मालकी हस्तांतरणासाठी याचा उपयोग होतो. असे असूनही, वाहनमालक आरसी प्रमाणपत्र बाळगण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ------------------------वाहन परवान्यावर नागरीक व्यवस्थित पत्ता देतात. त्यामुळे वाहन परवाना त्यांना व्यवस्थित मिळतो. मात्र, वाहन वितरकाकडे योग्य पत्ता न नोंदविल्याने नागरिकांना आरसी बुक मिळत नाहीत. अशी अनेक कागदपत्रे टपाल कार्यालयाने आरटीओकडे परत पाठविली आहेत. संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ----------------------------

आरसीबुकची वर्षनिहाय संख्या

साल            वितरण संख्या        परत आलेले टपाल        कार्यालयातून वितरण झालेली संख्या२०१५-१६        ३,४३,८७३        २०,२७२            ८,१३७२०१६-१७        २,७४,१०३        ८,४५८            ६,५७१२०१७-१८        ३,४८,६७९        १५,६४९            ४,१८८

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस