शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांना जीवदान; पुण्यातील पिंपळवंडी शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 18:59 IST

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे. 

ठळक मुद्दे४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यशमादी बिबट्यामागे फिरत असताना हे बछडे विहिरीत पडल्याचा अंदाज

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे. पिंपळवंडीच्या बंगलावस्ती येथील सुरेश सखाराम पोटे यांचे विहिरीत गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे पडून कठड्यावर बसले असल्याचे विजय कालेकर, शुभम कालेकर, वैभव कालेकर, शशिकांत घाडगे, यांनी पाहिले. तत्काळ विजय कालेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी ओतूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांचेशी संपर्क साधला. वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे डॉ. अजय देशमुख हे बिबट रेस्क्यू पथकासह घटनास्थळी आले. दरम्यान वनकर्मचारी व ग्रामस्थ यांनी त्यांना विहिरीतून वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डॉ अजय देशमुख हे दोरीच्या साह्याने खाली उतरले व अखेर दीड तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. हे बछडे अंदाजे ४ ते ५ महिने वयाचे असल्याचे वनपाल संदीप खट्टे, वनरक्षक विवेक विभुते यांनी सांगितले. 

त्यांच्यावर ओतुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर माणिकडोह येथील निवारण केंद्रात नेण्यात आले आहे. तर मादी बिबट्यामागे फिरत असताना हे बछडे विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बंगलावस्ती या परिसरात बिबट्याची मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे तातडीने वनविभाग पिंजरा लावला आहे. या घटनेने पिंपळवंडी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :leopardबिबट्याJunnarजुन्नरPuneपुणे