शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...‘जगणे’ अद्यापही गावकुसाबाहेरचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:19 IST

एके काळी अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर, हगणदरीजवळ राहायला भाग पाडण्यात आलेल्या समाजसमूहांपैकी अनेक समूह आजही तशाच अवस्थेत जगत आहेत.

बारामती : एके काळी अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर, हगणदरीजवळ राहायला भाग पाडण्यात आलेल्या समाजसमूहांपैकी अनेक समूहआजही तशाच अवस्थेत जगत आहेत. काळाच्या कसोटीवर त्यांची ना त्या प्रमाणात प्रगती झाली, ना जीवनस्तर सुधारला. त्यांच्या नशिबी आजही गावकुसाबाहेरचेच जगणे आहे. याचाच प्रत्यय बारामतीमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगरमध्ये येतो आहे.अस्वच्छता, अपुरी स्वच्छतागृहे, जागोजाग पसरलेली दुर्गंधी आणि अनारोग्याचा फैलाव अशी दयनीय अवस्था येथील कष्टकऱ्यांच्या नशिबी आजही असल्याचे चित्र आहे. याकडे उदासीन राजकारणी आणि प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. शहरातील अण्णा भाऊ साठेनगर येथील २ हजार लोकसंख्येसाठी केवळ १० स्वच्छतागृहे आहेत. तर लहान मुलांसाठी असणारे ‘खुले स्वच्छतागृह’ दुर्गंधीला कारणीभूत ठरत आहे. नगरपालिकेने यावर उपाययोजना केल्यास परीसरातील चित्र बदलण्यास मदत होईल. बारामतीत प्रवेश करताच दिसणाºया अण्णा भाऊ साठेनगरची अवस्था वाईट आहे.येथे हौसिंग सोसायटीची स्थापना १९५६मध्ये झाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून त्या वेळी सोसायटीने ३४ घरे बांधूनदिली होती; पण आता त्या घरांची अवस्था फार वाईट झाली आहे. ही घरे पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. एखाद्या जोराच्या पावसात येथे अपघात होण्याची भीती आहे. घर म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये लोक राहतात. स्वच्छतेच्या बाबतीतदेखील येथील परिस्थिती वाईट आहे.लहान मुलांचे आरोग्य आले धोक्यातयेथील लोकवस्ती २ हजारांपेक्षा अधिक आहे; पण येथे पुरुषांना ५ आणि महिलांना ५ अशी स्वच्छतागृहे आहेत. अपुºया स्वच्छतागृहांमुळे अनेकांना उघड्यावर शौचाला जावे लागते. या वस्तीत असणारे लहान मुलांचे खुले स्वच्छतागृह केवळ येथेच पाहायला मिळते.या स्वच्छतागृहाला छत नाही, बाजूला भिंती नाहीत. मुलांना नाक दाबून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. मागील वर्षी येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या नावाने फलक लावून नाराजी व्यक्त केली होती. काँक्रिटीकरण झाले; पण ठराविक ठिकाणीच. सत्ताधारी फक्त आश्वासन देतात. मात्र, अद्यापपर्यंत परीस्थिती ‘जैसे थे’ आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे